लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी:शिर्डी शासकीय विश्रामगृह येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या शिंदेसेनेच्या पदाधिकारी बैठकीत कोपरगाव येथील दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली. या गोंधळाने एका पदाधिकाऱ्याला चक्क रुग्णालयात दाखल करावे लागले. या बैठकीत एका पदाधिकाऱ्याने दुसऱ्या महिला पदाधिकाऱ्याशी वाद घातला. मंत्री उदय सामंत, आमदार अमोल खताळ, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासमोरच हा गोंधळ झाल्याने महिला पदाधिकाऱ्याचा ब्लड प्रेशर वाढला. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.
राहाता व कोपरगाव तालुक्यातील शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी सकाळी बारा वाजेदरम्यान शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांची संपर्क मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आल्यामुळे त्यांनी राहाता व कोपरगाव येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस संगमनेरचे आमदार अमोल खताळ, माजी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, नितीन अवताडे, विजय काळे, विमल पुंडे, सविता शेळके, मनीषा डुबल व आदी शेकडो पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच कोपरगाव येथील दोन गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर शाब्दिक चकमकीत झाले. तिथे कोपरगाव गटातील एका पदाधिकाऱ्याची व दुसऱ्या गटातील महिला पदाधिकारी वाकचौरे यांच्यात हमरी-तुमरी सुरू झाल्याने या बैठकीत एकच गोंधळ उडाला. हा वाद वाढू नये म्हणून काही पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तरी देखील हा वाद मोठ्या प्रमाणात सुरूच राहिल्यामुळे शिवसेनेच्या महिला पदाधिकारी वाकचौरे यांचा अचानक ब्लड प्रेशर वाढल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
Web Summary : A verbal clash between two factions occurred during a Shinde Sena meeting chaired by Minister Uday Samant in Shirdi. The argument escalated, causing a female official's blood pressure to spike, requiring hospitalization. The incident happened in front of Minister Samant and other leaders.
Web Summary : शिरडी में मंत्री उदय सामंत की अध्यक्षता में शिंदे सेना की बैठक के दौरान दो गुटों में तीखी नोकझोंक हुई। बहस बढ़ने से एक महिला पदाधिकारी का रक्तचाप बढ़ गया, जिसके बाद उन्हें अस्पताल में भर्ती कराना पड़ा। यह घटना मंत्री सामंत और अन्य नेताओं के सामने हुई।