शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे आणले लाल कांद्याचे, मात्र पिकला पांढरा कांदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 16:16 IST

देवळाली प्रवरा परिसरातील अनेक शेतक-यांची कांद्याच्या बियाणात फसवणूक झाली आहे. एका कंपनीचे बियाणे राहुरी येथील एका कृषी सेवा केंद्रातून खरेदी केले होते.

राहुरी : देवळाली प्रवरा परिसरातील अनेक शेतक-यांची कांद्याच्या बियाणात फसवणूक झाली आहे. एका कंपनीचे बियाणे राहुरी येथील एका कृषी सेवा केंद्रातून खरेदी केले होते. हे बियाणे लाल कांद्याऐवजी पांढ-या कांद्याचे निघाले आहे. यामुळे अनेक शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

देवळाली प्रवरा येथील नितीन बबन खांदे, रोहित विठ्ठल शेटे या शेतक-यांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्ञानेश्वर कृषी सेवा केंद्रातून २ ऑक्टोबर २०२० रोजी ३५ हजार रुपयांचे लाईट रेड कंपनीने लाल कांद्याचे गावरान बियाणे खरेदी केले होते. शेतात कांदा जसजसा मोठा होऊ लागला. तसतसा तो पांढरा आढळून येऊ लागला. यानंतर बियाणात फसवणूक झाल्याचे शेतक-यांच्या निदर्शनास आले. यानंतर तातडीने कृषी सेवा केंद्राशी संपर्क केला. त्यांनी कांदा बियाणे कंपनीशी संपर्क साधला असता पांढरा कांदा ऐवजी लाल कांदा देण्याचे आश्वासन दिले. मात्र, पुन्हा कंपनीने शेतक-यांना प्रतिसाद दिला नाही. यानंतर शेतक-यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

.....

कांदा बियाणात आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही राहुरी येथील उंडे कृषी सेवा केंद्र चालकांशी संपर्क साधला होता. त्यावेळी उंडे यांनी लाईट रेड कंपनीच्या अधिका-यांशी संपर्क केला. यावेळी तुम्हाला पांढ-या कांद्याच्या बदल्यात लाल कांदा देऊ, असे कंपनीने सांगितले होते. पण नंतर परत कंपनीवाल्यांनी आमचे फोन उचलले नाहीत. त्या कंपनीवर कारवाई करून नुकसान भरपाई मिळावी.

‌-नितीन खांदे, शेतकरी, देवळाली प्रवरा.

......

पांढरा कांदा निघाल्यानंतर आम्ही कंपनीशी बोललो होतो. काढणीच्या वेळी पांढ-या कांद्याऐवजी लाल कांदा देण्याचे ठरले होते. अजून खूप दिवस बाकी आहेत. शेतक-यांनी संयम धरावा. 

-ज्ञानेश्वर उंडे, कृषी सेवा केंद्र चालक, राहुरी.

......

कांदा बियाणात फसवणूक झाल्याच्या तालुक्यातून वळण, देवळाली प्रवरा, टाकळीमियाॅ या गावातील शेतक-यांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार तालुका तक्रार निवारण समिती त्याठिकाणी भेट देऊन त्या बियाणांसंदर्भात सर्व माहिती गोळा करणार आहे. त्यानंतर योग्य तो अहवाल पाठविला जाईल.

-महेंद्र ठोकळे, तालुका कृषी अधिकारी, राहुरी.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी