माध्यमिकचे वर्ग सुरू करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:30+5:302021-07-15T04:16:30+5:30

तिसगाव : जुलैच्या शासन निर्देशानुसार आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू केले जावेत, असा निर्णय तिसगाव (ता.पाथर्डी) येथे वृद्धेश्वर ...

Secondary classes should be started | माध्यमिकचे वर्ग सुरू करावेत

माध्यमिकचे वर्ग सुरू करावेत

तिसगाव : जुलैच्या शासन निर्देशानुसार आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू केले जावेत, असा निर्णय तिसगाव (ता.पाथर्डी) येथे वृद्धेश्वर हायस्कूलमध्ये घेण्यात आलेल्या सरपंच, शालेय शिक्षकांच्या बैठकीत घेण्यात आला.

स्मार्ट मोबाईल नसलेल्या वंचितांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ मिळत नाही. महामारीच्या कालखंडात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. घरी मुले अभ्यासच करीत नाहीत. अशा बाबी विचारात घेता सर्व प्रकारची दक्षता घेऊन शाळा सुरू केल्याच पाहिजेत, असा सूर बैठकीत निघाला. मंगळवारी दुपारी तिसगावचे सरपंच काशिनाथ लवांडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. संस्था कार्यवाह चंद्रकांत म्हस्के, आरोग्याधिकारी डॉ. बाबासाहेब होडशीळ, डॉ. बाळकृष्ण मरकड, कानिफनाथ देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, वृद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गणेश पालवे व्यासपीठावर होते.

प्राचार्य महादेव मरकड यांनी प्रारंभी शासन निर्णयात घालून दिलेल्या अटी व शर्तीबाबत उपस्थितांना माहिती दिली. सरपंच गणेश पालवे, राजेंद्र पालवे, रवींद्र आरोळे, संजय मरकड, सुधाकर वांढेकर, राजेंद्र म्हस्के, विठ्ठल कोलते, तनपुरे, उप मुख्याध्यापक लक्ष्मण सोळसे, कामगार तलाठी आदींनी चर्चेत सहभाग घेतला. राजू पवार यांनी सूत्रसंचालन केले. दादासाहेब मरकड यांनी आभार मानले.

Web Title: Secondary classes should be started