खर्डा येथील सात दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:48+5:302021-03-26T04:20:48+5:30

खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे प्रांताधिकाऱ्यांच्या पथकाने कोरोना नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी साडेपाच हजाराचा दंड वसूल करण्यात ...

Seal seven shops in Kharda | खर्डा येथील सात दुकाने सील

खर्डा येथील सात दुकाने सील

खर्डा : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे प्रांताधिकाऱ्यांच्या पथकाने कोरोना नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी साडेपाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला. सात दुकाने सात दिवसांसाठी सील करण्यात आली.

येथील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी आठवडे बाजारच्या दिवशी (गुरुवारी) विनामास्क फिरणारे, सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी साहेबराव कोकणी आदी उपस्थित होते. यावेळी साडेपाच हजाराचा दंड वसूल करण्यात आला. सात दुकानांना सात दिवस सील करण्यात आले. येथील कानिफनाथ यात्रा यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.

यावेळी मंडलाधिकारी संजय गायकवाड, मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे, तलाठी श्रीराम कुलकर्णी, सुखदेव कारंडे, खर्डा ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, सरपंच आसाराम गोपाळघरे, सेवा संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत लोखंडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शशिकांत म्हस्के आदी उपस्थित होते.

Web Title: Seal seven shops in Kharda