शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मावसभावाकडून शाळकरी मुलाचे अपहरण

By admin | Updated: June 19, 2016 23:12 IST

शेवगाव : तालुक्यातील हसनापूर येथील आजिनाथ भगवान ढाकणे (वय १०) शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रकार शेवगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासात उघडकीस आणला.

शेवगाव : तालुक्यातील हसनापूर येथील आजिनाथ भगवान ढाकणे (वय १०) शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रकार शेवगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासात उघडकीस आणला. मावस भावाने मुलाचे अपहरण केल्याचे तपासात निष्पन्न झाले. सदर मुलास पोलिसांनी रविवारी सुखरूपपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. पोलीस सूत्रांची माहिती अशी की, आजिनाथ भगवान ढाकणे हा शाळकरी मुलगा शनिवारी शाळा सुटल्यानंतर दुपारी १२ च्या सुमारास शाळेतून घरी न पोहचल्याने त्याचे वडील भगवान बाजीराव ढाकणे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सुहास हट्टेकर व सहाय्यक भाऊसाहेब खाटीक यांनी पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगाने चक्रे फिरवत चौकशी केली असता भगवान बाजीराव ढाकणे यांना एका मोबाईल वरून निनावी फोन आला. या फोनवरून तपास पोलिसांनी तो नंबर ट्रेस केला असता सदर मुलगा शाळा सुटल्यानंतर त्याच्या मावस भावाच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. मावस भावाकडे चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीत विसंगती आढळून आल्याने पोलिसांनी खाक्या दाखवताच मावस भावाने मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याने १८ रोजी आजिनाथ यास शाळा सुटल्यानंतर घरी सोडण्याच्या बहाण्याने स्वत:च्या गाडीवरून शास्त्रीनगर मधील स्वत:च्या खोलीवर नेऊन ठेवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शेवगावमधील एका मित्राच्या रूमवर नेऊन ठेवले व त्यानंतर आजिनाथच्या वडिलांना धमकीचा फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच फोन मुळे हे अपहरण नाट्य उघडकीस येण्यास मोठी मदत मिळाली. (तालुका प्रतिनिधी)