कर्जत : तालुक्यातील चिलवडी व पिंपळवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जाती महिला राखीव निघाले. परंतु, येथे या आरक्षणाचा प्रभाग आरक्षित नव्हता. सरपंचपदासाठी कोणीही निवडून आलेले नाही. त्यामुळे येथील सरपंचपद रिक्त राहणार आहे.
तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या आगामी पाच वर्षांसाठीचे सरपंचपदाचे आरक्षण प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळेे यांनी बुधवारी जाहीर केले.
तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यामुळे आपल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण काय निघतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. त्यामुळे सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीसाठी गर्दी झाली होती.
सरपंचपदासाठी प्रवर्गनिहाय आरक्षित झालेल्या ग्रामपंचायती अशा : अनुसूचित जाती- सिद्धटेक, पाटेवाडी, जलालपूर, रेहेकुरी, आखोणी, चापडगाव. अनुसूचित जमाती- टाकळी खंडेश्वरी. अनुसूचित जाती स्त्री राखीव- तिखी, शिंपोरा, पिंपळवाडी, चिलवडी, बिटकेवाडी. नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव- खांडवी, रातंजण, चिंचोली रमजान, वायसेवाडी, राक्षसवाडी बुद्रुक, निमगाव डाकु, बेनवडी, कोकणगाव, चिंचोली काळदात, माळंगी, वालवड, चांदे बुद्रुक, दूरगाव. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - बजरंगवाडी, पाटेगाव, नागापूर, आंबिजळगाव, जळगाव, बारडगाव दगडी, नागलवाडी, बारडगाव सुद्रिक, अळसुंदे, नांदगाव, निंबे, देशमुखवाडी. सर्वसाधारण- कौडाणे, लोणी मसदपूर, राशीन, गुरवपिंपरी, बाभुळगाव खालसा, कोपर्डी, थेरगाव, रुईगव्हाण, बेलगांव, धालवडी, रवळगांव, निंबोडी, खेड, माही, सीतपूर, दिघी, निमगाव गांगर्डे, मलठण, घुमरी, खंडाळा, काळेवाडी, गणेशवाडी, तोरकडवाडी, परिटवाडी, तरडगाव, कापरेवाडी, नागमठाण. सर्वसाधारण महिला राखीव- डिकसळ, थेरवडी, कुळधरण, कोंभळी, वडगाव तनपुरे, चांदे खुर्द, शिंदा, भांबोरा, खातगांव, मिरजगाव, भोसे, मांदळी, मुळेवाडी, तळवडी, कोरेगाव, सुपे, राक्षसवाडी खुर्द, कानगुडवाडी, करपडी, दुधोडी, कुंभेफळ, बहिरोबावाडी, औटेवाडी, जळकेवाडी, नवसरवाडी, सोनाळवाडी, करमणवाडी.
यावेळी निवास नायब तहसीलदार सुरेश वाकचौरे, नायब तहसीलदार मनोज भोसेकर, मंडल अधिकारी मोहसीन शेख, वरिष्ठ लिपिक संजय दुधभाते आदी उपस्थित होते.