शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

सॅनेटरी नॅपकीनचा ठेका रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 10:46 IST

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने बाजारभावापेक्षा जास्तीच्या दराने सॅनेटरी नॅपकीन खरेदीचे टेंडर मंजूर केले होते़ तब्बल दुप्पट दराने सॅनेटरी नॅपकीनचा घाट घातल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर हे टेंडर जिल्हा परिषदेने रद्द करण्याचा आदेश मंगळवारी (दि़१) काढला़

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने बाजारभावापेक्षा जास्तीच्या दराने सॅनेटरी नॅपकीन खरेदीचे टेंडर मंजूर केले होते़ तब्बल दुप्पट दराने सॅनेटरी नॅपकीनचा घाट घातल्याची बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर हे टेंडर जिल्हा परिषदेने रद्द करण्याचा आदेश मंगळवारी (दि़१) काढला़ जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून व समाजकल्याण विभागाच्या विशेष घटक योजनेतून सुमारे सव्वा दोन कोटी रुपये खर्चून सॅनेटरी नॅपकीन खरेदी करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने टेंडर प्रक्रिया राबविली़ जळगावच्या श्री अ‍ॅनालीटीकल टेस्टिंग अ‍ॅण्ड रिसर्च लेबॉरेटरी संस्थेला सॅनेटरी नॅपकीनचा पुरवठा करण्याचा ठेका देण्यात आला होता़ ७ रुपये ५० पैसे दराने सॅनेटरी नॅपकीन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता़ हा निर्णय घेण्यापूर्वी बाजारभावाचा अहवाल मागविण्यात आला होता़ या अहवालात ८ रुपये २५ पैशाला बाजारात एक सॅनेटरी नॅपकीन मिळत असल्याचे सांगण्यात आले होते़ त्यानुसार ७ रुपये ५० पैसे हा दर कमी असल्याचे सांगून अधिका-यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही हा अहवाल तयार करणाºयांनी केला़ ही माहिती ‘लोकमत’ला मिळाल्यानंतर ‘लोकमत’ने बाजारातील सॅनेटरी नॅपकीनचे दर तपासून पाहिले़ यात एक सॅनेटरी नॅपकीन ४ रुपये ५० पैशाला मिळत असल्याचे निदर्शनास आले़ याबाबत लोकमतने ‘झेडपीचे सॅनेटरी नॅपकीन बाजारभावापेक्षा महाग’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले़या वृत्तानंतर जिल्हा परिषदेने पुन्हा बाजारभाव तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले़ हा अहवाल सोमवारी सायंकाळी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला़ हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी सॅनेटरी नॅपकीनचे टेंडर रद्द करण्याचा आदेश काढला़ जिल्हा परिषदेचे वाचले ९६ लाखबाजारभावानुसार एक सॅनेटरी नॅपकीन ४ रुपये ४६ पैशाला मिळत आहे़ तर महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने ७ रुपये ५० पैसे हा दर पुरवठादाराला देऊ केला होता़ ठेकेदाराने पुरवठा करण्यापूर्वीच ‘लोकमत’ने दरांमधील तफावत उघडकीस आणली़  जर ७ रुपये ५० पैसे दरानेच सॅनेटरी नॅपकीनची खरेदी झाली असती तर ठेकेदाराला सुमारे ९६ लाख रुपये अतिरिक्त गेले असते़ दिशाभूल करणा-यांवर कारवाई करणार का?‘लोकमत’च्या वृत्तानंतर जिल्हा परिषदेने आरोग्य विभागातील परिचारक संदीप काळे, सहाय्यक लेखा अधिकारी यशवंत सालके यांची समिती नेमून बाजारातील सॅनेटरी नॅपकीनचे दर तपासून अहवाल मागविण्यात आला होता़ या अहवालानुसार बाजारात ४ रुपये ४६ पैशाला एक सॅनेटरी नॅपकीन उपलब्ध असल्याचे निदर्शनास आले़ तर पूर्वीच्या अहवालात एक सॅनेटरी नॅपकीन ८ रुपये २५ पैसे दराने मिळत असल्याचे म्हटले होते़ म्हणजे पूर्वीच्या अहवालात सुमारे दुप्पट दर दाखवून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आली होती़ प्रशासनाची दिशाभूल करणाºयांवर आता जिल्हा परिषद कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे़

टॅग्स :zpजिल्हा परिषदAhmednagarअहमदनगर