शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीपदासाठी रस्सीखेच

By admin | Updated: July 30, 2014 00:46 IST

शेवगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडीस मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

शेवगाव : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडीस मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. यामुळे राष्ट्रवादीची व्होट बँक अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. त्यादृष्टीने सभापतीपदाकरिता कुणास संधी मिळणार? याबाबतच्या चर्चेस वेग आला आहे. सभापतीपदाकरिता रस्सीखेच अटळ आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमध्ये शेवगाव पंचायत समिती सभापतीपद हे सर्वसाधारण महिला सदस्यांकरीता आरक्षीत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पंचायत समितीचे सभापतीपद हे सध्या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सदस्यांकरिता राखीव आहे. दहिगावने पंचायत समिती गणाच्या सदस्या छाया बाळासाहेब धोंडे(सुलतानपूर मठाची वाडी) या पंचायत समितीच्या सभापतीपदावर सध्या विराजमान आहेत.पंचायत समितीवर घुले बंधुंची घट्ट पकड आहे. १० पैकी ८ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. पंचायत समितीचे सभापतीपद हे महिला सदस्यांकरिता आरक्षीत असल्याने अरुण पाटील लांडे हे उपसभापती म्हणून कार्यरत आहेत. आता सभापतीपदाच्या नव्याने जाहीर झालेल्या आरक्षणाच्या सोडतीत शेवगाव पंचायत समितीचे सभापतीपद हे सर्वसाधारण महिला सदस्यांकरिता आरक्षीत जाहीर झाले आहे. पंचायत समितीत सत्ताधारी राष्ट्रवादीच्या चार विद्यमान महिला सदस्या कार्यरत आहेत. विद्यमान सभापती धोंडे यांना मुदतवाढ मिळणार की नवीन महिला सदस्यास संधी मिळणार? हा प्रमुख विषय आहे. चापडगाव गणाच्या सदस्या लता अशोक डाके या शेवगावच्या माजी सरपंच अशोकराव डाके यांच्या पत्नी आहेत. त्यांना संधी मिळण्याची चिन्हे आहेत.आखेगाव गणाच्या सदस्या मंगल माधव काटे या केदारेश्वरचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांचे कट्टर समर्थक माधव काटे यांच्या पत्नी आहेत. त्यांना संधी देऊन ढाकणे गटाची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न अ‍ॅड.घुले करणार? याबाबतची ही चर्चा रंगली आहे. याशिवाय घोटण पंचायत समिती गणाच्या सदस्या ताराबाई ढोरकुले यांच्याही नावाची चर्चा आहे. एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्व आले आहे. (प्रतिनिधी)