शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रोहिणी शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:26 IST2021-09-09T04:26:56+5:302021-09-09T04:26:56+5:30
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील पंडित नेहरू विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रोहिणी शिंदे तर उपाध्यक्षपदी महादेव लाळगे ...

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रोहिणी शिंदे
आढळगाव : श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील पंडित नेहरू विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रोहिणी शिंदे तर उपाध्यक्षपदी महादेव लाळगे यांची बिनविरोध निवड झाली. नुकत्याच पार पडलेल्या या निवडीमध्ये प्रथमच अध्यक्षपदावर महिलेला संधी मिळाली आहे.
विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन समितीची दोन वर्षांसाठी निवड करण्यासाठी नुकतीच पालक सभा पार पडली. पालकांमधून रोहिणी शिंदे, मानसिंग वाकडे, संध्या छत्तिसे, सागर वाकडे, संजय गिरमकर, महादेव लाळगे,सुरेखा सूर्यवंशी, संदीप डोके, नाना गाढवे, संदीप बोळगे, अंजुम इनामदार, परसराम भोसले यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. शिक्षणतज्ज्ञ म्हणून शरद गव्हाणे यांना शाळा व्यवस्थापन समितीवर घेण्यात आले. या सदस्यांनी सर्वानुमते अध्यक्षपदी रोहिणी शिंदे आणि उपाध्यक्षपदी महादेव लाळगे यांची बिनविरोध निवड केली.
विद्यालयातील शैक्षणिक वातावरण विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील. यासाठी समिती प्रयत्नशील राहणार आहे. तसेच कोरोनाच्या संकटात शाळा बंद असल्या तरीही ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यासाठी पालकांनी पाल्याकडे लक्ष देण्याचे आवाहन अध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी पालकांना केले. प्राचार्य पंडित घोंगडे, पर्यवेक्षक पंडित आढाव, गुरुकुल विभागप्रमुख अंकुश जामदार, विलास शेळके, बापू काळे, जयश्री कुदांडे आदी उपस्थित होते.
080921\20210905_154527.jpg~080921\img-20210906-wa0011.jpg
रोहिणी शिंदे फोटो~महादेव लाळगे फोटो