भरदिवसा लूट करणारा दरोडेखोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:37+5:302021-07-24T04:14:37+5:30

जामखेड : चार महिन्यांपूर्वी तालुक्यातील डिसलेवाडी शिवारात सकाळी अकरा वाजता (रा. वाई, जि. सातारा) येथील पती-पत्नीला लुटणाऱ्या दरोडेखोराला शुक्रवारी ...

Robbers arrested for looting all day | भरदिवसा लूट करणारा दरोडेखोर जेरबंद

भरदिवसा लूट करणारा दरोडेखोर जेरबंद

जामखेड : चार महिन्यांपूर्वी तालुक्यातील डिसलेवाडी शिवारात सकाळी अकरा वाजता (रा. वाई, जि. सातारा) येथील पती-पत्नीला लुटणाऱ्या दरोडेखोराला शुक्रवारी तालुक्यातील खांडवी गावात जामखेड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून ५ तोळे ६ ग्रॅम सोने हस्तगत केले.

१२ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११ वाजता फिर्यादी उमेश रा. गिरी (वय ४१, रा. वाई, जि. सातारा) व त्यांची पत्नी जामखेडकडे मोटारसायकलवरून येत होते. त्यावेळी डिसलेवाडी गावाच्या शिवारात आले असता, त्यांना लुटण्यात आले होते. त्यावरून फिर्यादीच्या तक्रारीवरून जामखेड पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात व गुन्हे शोध पथक करीत होते. गुन्ह्याचा शोध करीत असताना पोलीस उपनिरीक्षक थोरात व गुन्हे शोध पथकाचे इतर पोलीस अंमलदार यांना दरोडा टाकणारा लखन जिंतूर भोसले हा त्याचे गावी (खांडवी) येथे आला आहे, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी खांडवी गावात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या गुन्ह्यात आणखी दोन आरोपी रेखाबाई जिंतूर भोसले व तुकाराम सूर्यभान काळे व इतर तिघे फरार आहेत.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पो. कॉ. अविनाश ढेरे, संग्राम जाधव, संदीप राऊत, विजय कोळी, आबा आवारे, अरूण पवार, सचिन देवढे यांनी केली.

Web Title: Robbers arrested for looting all day