कुकाण्यात नेवासा-शेवगाव रस्त्यावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:38+5:302021-07-15T04:16:38+5:30

कुकाणा : कुकाण्यातील नेवासा-शेवगाव रस्त्यावर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास जैऊर हैबती (ता.नेवासा) येथील नंदीवाले समाज बांधवांच्या वतीने दोन तास ...

Road blockade on Nevasa-Shevgaon road in Kukana | कुकाण्यात नेवासा-शेवगाव रस्त्यावर रास्ता रोको

कुकाण्यात नेवासा-शेवगाव रस्त्यावर रास्ता रोको

कुकाणा : कुकाण्यातील नेवासा-शेवगाव रस्त्यावर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास जैऊर हैबती (ता.नेवासा) येथील नंदीवाले समाज बांधवांच्या वतीने दोन तास रास्ता रोको करण्यात आला.

जेऊर हैबती येथे मुरूम-मातीचे बेकायदा उत्खनन करून गौण खनिज चोरी केल्याप्रकरणी कामगार तलाठी व कुकाणा मंडलाधिकारी यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल व ग्रामस्थांना अपशब्द वापरल्याबद्दल तत्काळ निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

यावेळी तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेऊन निवेदन स्वीकारले. चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. सुराणा यांनी जेऊर हैबती येथील मुरुम व मातीचे उत्खनन झालेल्या जागेची प्रत्यक्ष पहाणी केली.

माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब फुलमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. जेऊर हैबती येथे नंदीवाले समाजाची दीडशे घरे आहेत. अंदाजे सहाशे लोकवस्ती आहे. शासनाने येथील गट नं. २८९ मध्ये घरकुले दिली आहे. त्या घरकुलांची नोंद गावाच्या रेकॉर्डला झालेली आहे. घुगरे वस्ती व म्हस्के वस्तीच्या जवळ नदीच्या तीरावर समाजाचे रामबाबांचे जुने मंदिर आहे. ही जागा इनामी असून शासकीय आहे. या मंदिरासमोरील जागेत काहींनी अनधिकृतपणे मुरुम व माती उत्खनन केले. येथील कामगार तलाठी व कुकाणा मंडलाधिकारी यांनी येथे येऊन कुणालाही न सांगता जागेचा बोगस, बेकायदा पंचनामा केला. उत्खननात वापरलेल्या जेसीबीचे मालक, चालक यांच्याशी आर्थिक संगनमत केले. महसूल कर्मचारी पंचनाम्यासाठी आले असता बेकायदा गौण खनिजाच्या उत्खननाबाबत माहिती देत असताना तलाठी व मंडलाधिकारी यांनी ग्रामस्थांना अपशब्द वापरून दमबाजी केली. त्याबाबतची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने हा प्रकार इतर ग्रामस्थांना समजला. त्यामुळे तलाठी व मंडलाधिकारी यांच्यावर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.

---

१४ कुकाणा

कुकाणा येथील रास्ता रोको आंदोलन प्रसंगी तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

Web Title: Road blockade on Nevasa-Shevgaon road in Kukana