कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:46+5:302021-06-04T04:16:46+5:30
नगर शहरातील रुग्णसंख्या दोन दिवसांपेक्षा आज वाढली. जामखेड, पारनेर, श्रीगोंदा, नगर ग्रामीण, संगमनेर आणि अकोले या तालुक्यात ...

कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ
नगर शहरातील रुग्णसंख्या दोन दिवसांपेक्षा आज वाढली. जामखेड, पारनेर, श्रीगोंदा, नगर ग्रामीण, संगमनेर आणि अकोले या तालुक्यात शंभरपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. अन्य तालुक्यातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. जिल्ह्याच्या रूग्णसंख्येत १,३२६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८ हजार ५२० इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २६८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६८६ आणि अँटिजन चाचणीत ३७२ रुग्ण बाधित आढळले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५३ हजार ५९५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.५३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, २४ तासात २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
----
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्ण संख्या : २,५३,५९५
उपचार सुरू असलेले रूग्ण : ८५२०
मृत्यू : ३,३५६
एकूण रूग्णसंख्या : २,६५,४७१