शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

मोहोजखुर्दला दरोडा

By admin | Updated: January 16, 2016 23:09 IST

पाथर्डी : तालुक्यातील मोहोजखुर्द खंडोबानगर येथील ठोकळ वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात आठ ते नऊ जणांच्या टोळीने जगन्नाथ ठोकळ यांच्या घरावर दरोडा टाकीत दागिने घेऊन पोबारा केला़

पाथर्डी : तालुक्यातील मोहोजखुर्द खंडोबानगर येथील ठोकळ वस्तीवर शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात आठ ते नऊ जणांच्या टोळीने जगन्नाथ ठोकळ यांच्या घरावर दरोडा टाकीत ठोकळ दाम्पत्यास जबर मारहाण करीत सुमारे २८ हजार रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला़शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा ते १ वाजण्याच्या सुमारास ठोकळ कुटुंबीय झोपेत असताना दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला़ ठोकळ दाम्पत्याला जाग आल्यानंतर चाकूचा धाक दाखवून गज, काठ्या व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली़ तसेच आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ठोकळ यांच्या पत्नीच्या अंगावरील तसेच मुलीच्या अंगावरील सोन्या, चांदीचे दागिने असा मिळून २७९०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ठोकळ यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदविला असून, सहायक पोलीस निरीक्षक योगेश कामाले हे पुढील तपास करीत आहेत़ घटनेची माहिती मिळताच अप्पर जिल्हा पोलीसप्रमुख पंकज देशमुख, उपविभागीय अधिकारी कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश कामाले, पोलीस उपनिरीक्षक गणेश हिवरकर, श्रीराम शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले़ मात्र, दरोडेखोरांचा माग काढण्यात श्वानपथकाला अपयश आले़ दरम्यान, त्याच रात्री काशीनाथ आव्हाड व ताजमहंमद शेख (रा.कासारवाडी) यांच्या घरीही चोरी झाली़ ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.