शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प

By admin | Updated: August 17, 2015 00:02 IST

अहमदनगर : हागणदारीमुक्तीसाठी शौचालय बांधून त्यांच्या वापरात सातत्य ठेवणाऱ्या ९ तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींना अस्मिता ग्राम पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

अहमदनगर : हागणदारीमुक्तीसाठी शौचालय बांधून त्यांच्या वापरात सातत्य ठेवणाऱ्या ९ तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींना अस्मिता ग्राम पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी पुढील चार वर्षात जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनी या १६ गावातील पदाधिकारी आणि ग्रामसेवक यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या गावात अस्मिता ग्रामची कोनशिला बसवण्यात आली. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती नंदा वारे, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव गवारे, विश्वनाथ कोरडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव जगताप उपस्थित होते. २०१९ पर्यंत संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला. अस्मिता ग्राम पुरस्कार मिळवणाऱ्या ग्रामपंचायतींचा आदर्श अन्य गावांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, संगीतादेवी पाटील, महिला बालकल्याण अधिकारी मनोज ससे आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या उज्ज्वला बावके उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)