पढेगावात महावितरणकडून ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST2020-12-24T04:19:10+5:302020-12-24T04:19:10+5:30
कोपरगाव : संगमनेर विभागीय कार्यालयाच्या सूचननेनुसार कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे एक गाव एक दिवस, महावितरण आपल्या गावी हा उपक्रम ...

पढेगावात महावितरणकडून ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन
कोपरगाव : संगमनेर विभागीय कार्यालयाच्या सूचननेनुसार कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे एक गाव एक दिवस, महावितरण आपल्या गावी हा उपक्रम मंगळवारी (दि.२२) राबविण्यात आला. या उपक्रमातून गावातील ग्राहकांच्या तक्रारीच्या निवारणासह विविध कामे करण्यात आली असल्याची माहिती महावितरणकडून सांगण्यात आली आहे.
कोपरगाव ग्रामीण उपविभागातंर्गत असलेल्या कारवाडीतील ग्राहकांच्या ४ चुकीच्या वीजबिलांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच गावातील ६ वाकलेले विजेचे खांब सरळ करून २५ गाळ्यातील वीजतारा ओढण्यात आल्या. ४ ग्राहकांची खराब झालेली सर्विस वायर बदलून देण्यात आल्या, गावातील खराब झालेल्या एका रोहीत्राचा बॉक्स बदलण्यात आला, तसेच काही ठिकाणी २ नवीन खांबांची उभारणी करण्यात आली. तसेच नवीन वीज जोड मागणी संदर्भातील कागदपत्र स्वीकारण्यात आली आहे.