शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
4
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
5
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
6
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
7
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
8
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
9
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
10
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
11
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
12
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
19
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
20
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Daily Top 2Weekly Top 5

मोठे दगड तातडीने काढा ; दरडीच्या दहशतीपासून वाचवा

By admin | Updated: August 3, 2014 01:10 IST

पारनेर : ‘आम्ही चिश्ती बाबांच्या कृपेने पूर्वी अनेकदा वाचलो, परंतु आता आपत्ती येण्याआधीच शासनाने काळजी घ्यावी

पारनेर : ‘आम्ही चिश्ती बाबांच्या कृपेने पूर्वी अनेकदा वाचलो, परंतु आता आपत्ती येण्याआधीच शासनाने काळजी घ्यावी व डोंगरावरील मोठे दगड व दरडी त्वरीत हटवाव्यात व आमच्या लोकांना दरडीच्या दहशतीपासून वाचवा’ अशी कैफियत पारनेर तालुक्यातील दरोडी ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांसमोर मांडली. आता या विषयावर येत्या मंगळवारी ग्रामस्थ व अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार आहे. पारनेर तालुक्यातील अळकुटीपासून चार ते पाच कि़ मी.अंतरावरील दरोडी गावामध्ये सुमारे तीस ते चाळीस कुटुंब डोंगराच्या कुशीत रहात असून त्यांना डोंगरावरील दरडी व मोठ्या दगडांचा धोका आहे. त्यामुळे दरोडी गावावर दरडीची टांगती तलवार असून येथील रहिवाशांचा जीव नेहमी टांगणीला असल्याचे वास्तव वृत्त ‘लोकमत’ मध्ये (२ आॅगस्ट) प्रसिध्द होताच पारनेर तालुक्यासह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तसेच ‘लोकमत’ ने पुणे जिल्ह्यातील माळीण येथील दुर्घटनेनंतर दरोडी येथील गावाची व्यथा जागरूकपणे मांडून हा विषय प्रशासन व लोकांपर्यंत पोहोचवल्याने सर्व थरातून या वृत्ताचे कौतूक करण्यात आले. दरोडी येथे राज्यभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले महंमद चिश्ती बाबांचा दर्गा प्रसिध्द आहे. राज्यातील अनेकांनी या वृत्तामुळे आपल्या नातेवाईकांशी चर्चा केली. (तालुका प्रतिनिधी)दहशतीखाली किती दिवस राहणार ?आम्ही डोंगराच्या दहशतीखाली किती दिवस राहणार? असे म्हणत डोंगराच्या कुशीत राहणारे अहमद शेख, नबाव शेख, गुलाब शेख, नुरमहंमद शेख, शहाबान शेख यांनी आपण कसे जीव मुठीत धरून राहतो याचा पाढाच प्रांताधिकाऱ्यांसमोर वाचला. तर ८० वर्षांची वृध्दा शरूबाई शेख या एकट्या रहात असून त्यांना मोठा धोका असल्याचे उपस्थितांनी सांगितले. यावेळी सरपंच कैलास कड, उपसरपंच लक्ष्मण कड, वन अधिकारी अनंत कोकाटे व एस.एस.साळवे आदी हजर होते.गंभीर दखल‘लोकमत’ ने दरोडीची व्यथा मांडल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे, निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी गंभीर दखल घेतली. जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. शुक्रवारी दुपारी सदस्य विश्वनाथ कोरडे, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार दत्तात्रय भावले यांनी दरोडी येथील धोकादायक डोंगर व मोठ्या दगडांची पाहणी करुन ग्रामस्थांशी चर्चा केली.अधिकाऱ्यांची दांडीप्रांताधिकारी संतोष भोर यांनी पारनेरचे बांधकाम विभागाचे उपअभियंता सोनवणे, पारनेर पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे अभियंता, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांना निरोप देऊनही त्यांनी दरोडी येथे येण्यास टाळले. यामुळे या प्रकरणाचे गांंभीर्य नसलेल्यांना नोटिसा पाठविण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले.