शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

श्रीरामपूरमध्ये घरफोडी : तलवारीच्या धाकाने लुटले १० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 13:03 IST

शहरातील अशोक रेसिडेन्सीच्या समोरील मथुरा विदाराम बालाणी यांच्या बंगल्यावर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकून तलवारीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १० लाखाचा ऐवज चोरुन नेला आहे.

श्रीरामपूर : शहरातील अशोक रेसिडेन्सीच्या समोरील मथुरा विदाराम बालाणी यांच्या बंगल्यावर मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी दरोडा टाकून तलवारीचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे १० लाखाचा ऐवज चोरुन नेला आहे.बंगल्याच्या मागील बाजूच्या किचनच्या रुमच्या खिडकीचे ग्रील्स वाकवून लहान मुलाने किचनमध्ये प्रवेश करुन किचनचे अन्य दोन दरवाजे उघडले. तेथून पाच ते सात चोरटे बंगल्यात घुसले होते. चोरट्यांनी किचनच्या शेजारी दोन रुममध्ये उचकापाचक केली. तेथे त्यांना काही मिळाले नाही. एका रुममध्ये बालाणी यांचा मुलगा चंदन बालाणी, पत्नी विशाखा बालाणी व कन्या रिया बालाणी हे तिघे झोपलेले होते. चोरट्यांनी रिया बालाणीला मारहाण केल्याने ती जागी झाली. चंदन व विशाखा हे आवाजाने जागे झाले असता दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्याला तलवार लावून कपाटांच्या चाव्यांची मागणी केली. चाव्या दिल्यानंतर चोरट्यांनी कपाट उघडून कपाटातील रोख रक्कम रुपये ६० हजार, लॉकरमधील सोने, चांदिचे दागिने, विशाखा हीच्या अंगावरील दागिने व चंदन याच्या हातातील अंगठ्या असे सुमारे तीस तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व मुलीचा लॅपटॉप चोरुन नेला.मथुरा बालाणी यांनी रात्री ३ वाजता शहर पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरुन दरोड्याची माहिती दिली. अप्पर पोलीस अधिक्षक रोहिदास पवार, पोलीस उपअधिक्षक राहुल मदने व पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून घटनेची पाहणी केली. दरोड्याच्या तपासासाठी तातडीने नगरहून श्वानपथक व ठसेतज्ञ पथक बोलाविण्यात आले. श्वानपथकाने डावखर मळ्यातील विहीरीपर्यत माग दाखविला. दरोडेखोर तेथून वाहनामध्ये फरार झाले असावेत असा अंदाज आहे. चंदन बालाणी यांनी दरोड्याच्या घटनेप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फियार्दीवरुन अज्ञात पाच ते सात दरोडेखोरांविरुध्द दरोड्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर