पाऊस पडल्याने पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:26+5:302021-07-15T04:16:26+5:30
वेळेवर पडलेल्या पावसामुळे या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनीही यंदा वेळेत खरिपाची पेरणी केली होती. यातून सोयाबीन, भुईमूग, बाजरी व इतर ...

पाऊस पडल्याने पिकांना जीवदान
वेळेवर पडलेल्या पावसामुळे या भागातील बऱ्याच शेतकऱ्यांनीही यंदा वेळेत खरिपाची पेरणी केली होती. यातून सोयाबीन, भुईमूग, बाजरी व इतर पिकांचीही चांगली उगवण झाली होती. मात्र त्यानंतर पावसाने तब्बल १५ दिवसांहून अधिक काळ दडी मारली होती.
कोरडवाहू भाग असलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार असे चित्र निर्माण झाले असतानाच पावसाच्या हलक्या व मध्यम स्वरूपाच्या सरी बरसू लागल्याने या पिकांना जीवदान मिळाले आहे. तहानलेला पिकांना संजीवनी मिळाल्याने शेतकरी सुखावले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांची रखडलेल्या पेरण्या उरकून घेण्याची लगबगही सुरू झाली आहे.
----------------
सोबत फोटो - १४ धामणगाव
पावसाने हजेरी लावल्याने धामणगाव आवारी भागात घोरपडवाडी परिसरात तरारलेली पिके.
-----