शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे क्रॉसिंग धोकादायकच!

By admin | Updated: July 28, 2014 00:52 IST

अहमदनगर: दोन दिवसांपूर्वीच तेलंगणच्या मेडक जिल्ह्यात रेल्वे फाटकावर पॅसेंजरने स्कू ल बसला दिलेल्या धडकेत २५ विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले.

अहमदनगर: दोन दिवसांपूर्वीच तेलंगणच्या मेडक जिल्ह्यात रेल्वे फाटकावर पॅसेंजरने स्कू ल बसला दिलेल्या धडकेत २५ विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले. नगर जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील अनेक मुलांना शहरातील नामवंत शाळेत घेऊन जाणाऱ्या स्कू ल बस रेल्वे पटरी ओलांडून नेहमीच ये-जा करतात. रेल्वेफाटक सुस्थितीत असले तरीही तेथे कधी दुर्घटना घडेल याचा नेमच नाही. काय आहे या रेल्वे फाटकाची स्थिती याची पाहणी टीम ‘लोकमत’ने केली आहे. त्यात रेल्वे क्रॉसिंग धोकादायक असल्याचं वास्तव समोर आलं. रेल्वे फाटकांची स्थिती समोर मांडणारा हा वृत्तांत....!अहमदनगर : नगर-मनमाड लोहमार्गाच्या लगत असणारे देहरे येथील रेल्वे क्रॉसिंग शॉर्टकट नव्हे तर साक्षात मृत्युचाच शॉर्टकट ठरत आहे. या शॉर्टकट व बेपर्वा क्रॉसिंगमुळे दहा ते बारा जणांचा आतापर्यंत बळी घेतला. जखमी झालेल्यांची तर गणनाच नाही. जीव मुठीत या गावात रोज हजारो पावले रेल्वेचे सर्रास पायवाटासारखा क्रॉसिंग करून मृत्यूला आमंत्रण देत आहे.देहरे (ता.नगर) या गावातूनच हा लोहमार्ग गेल्याने अर्धे गाव इकडे तर अर्धे गाव लोहमार्गाच्या पलीकडे गेले. रोजच गावातील लोकांची इकडून तिकडे ये-जा चालू असते. ती आधी पायी, सायकलवर तर कधी दुचाकीवरून सर्रासपणे एखादी पायवाट ओलांडावी तशी रेल्वे क्रॉसिंग ओलांडणे सुरू आहे. पूर्वी या ठिकाणी रेल्वे गेट होते. मात्र हा रस्ता मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे रेल्वे गेट बंद झाले तर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होत होता. याला पर्याय म्हणून उड्डाण पूल बांधला. यामुळे वाहतूक सुरळीत झाली. रेल्वेगेट काढण्यात आले. मात्र नागरिकांना या रेल्वेक्रॉसिंग वरूनच जाण्याची वेळ आली. यामुळे आतापर्यंत १०-१२ जणांचा जीव ही गेला. गावाच्या एका भागात सर्व शासकीय कार्यालय, बाजारपेठ, विद्यालय असल्यामुळे नागरिकांना, विद्यार्थ्यांना या रेल्वेक्रॉसींगवरून शॉर्टकटचा मार्ग धरावा लागत आहे. याचा मार्ग काढण्यासाठी ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलनही केले. याला पर्याय म्हणून भुयारी मार्ग ही काढण्यात आला. भुयारी मार्ग तयार होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण झाले. या भुयारी मार्गात पुन्हा नगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मध्येच आडवी आली. यामुळे भुयारी मार्ग होऊनही त्याचा फायदा अजुनही ग्रामस्थांना झाला नाही. याकामी मार्गाला कधी मुहूर्त मिळतो याकडे प्रशासनही दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. उड्डाणपुलाची गरजकोपरगाव रेल्वे स्टेशन अंतर्गत पाच रेल्वे क्रॉसिंग गेट आहेत़ या सर्व ठिकाणी भक्कम गेट, गेटमन असला तरी नागरिकांनाच वेळ नसल्याने आपला जीव धोक्यात घालून गेट खालून निघण्याचा प्रयत्न केला जातो़ गेट बंद झाल्याने होणारी गर्दी पाहता शिंगणापूर व पुणतांबा येथील गेटवर उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग काढण्यात येणे अत्यंत आवश्यक आहे़ कोपरगाव रेल्वे स्टेशन अंतर्गत अंचलगाव, शिंगणापूर, कान्हेगाव, संवत्सर, कोपरगाव ते येवला अशी पाच रेल्वे क्राँसिंग गेट आहेत़ येथील यंत्रणा अद्ययावत आहेत. गाडी येणार असल्यास फाटक लावले जाते़ त्यानंतर स्लॉटचा लाईट लागतो़ ही यंत्रणा स्टेशन मास्तरसमोर असलेल्या कंम्प्युटर पॅनलवर आॅपरेट केली जाते़ गाडी निघून गेल्यानंतर स्टेशन मास्तर स्लॉटचा इशारा देतो़ गेटमन समोर असलेल्या यंत्रणेत स्लॉट लाईट लागतो़ त्यानंतरच गेट उघडले जाते़ ही यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने चांगली असली तरी गेटवरून जाणाऱ्या येणाऱ्यांनाच जीवापेक्षा जास्त वेळेची किंमत झाली आहे़ त्यावरून गेटमनशी भांडणे केली जातात़ फाटकातून दुचाकी वाहने काढणे, सायकलस्वार, विशेषत: शाळकरी मुले-मुली गेटखाली वाकून सायकल काढतात़ शिंगणापूर गेट आणि पुणतांबा गेटवर ही दृष्ये सर्रास पहावयास मिळतात़ 1नगर-मनमाड महामार्गावर असणाऱ्या देहरे गावात जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर रेल्वे गेटच नाही. नागरिकांसह अबाल-वृद्ध असुरक्षितपणे रेल्वे ट्रॅक ओलांडतात.2राहुरी तालुक्यात धामोरी, वांबोरी स्टेशन, सडे चौकी, राहुरी स्टेशन याठिकाणी रेल्वे चौक्या अथवा गेट आहे. मात्र, नागरिक कशाचीच तमा न बाळगता सर्रास गेटखालून दुचाकी वाहने घेऊन जातात. 3कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आहे. त्याठिकाणी उड्डाण पूल अथवा भुयारी मार्ग आवश्यक आहे.

संकलन : सचिन धर्मापुरीकर, भाऊसाहेब येवले, नागेश सोनवणे