नेवासा फाटा येथे नोंदविला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:50+5:302021-06-27T04:14:50+5:30

नेवासा फाटा : ओबीसी समाजाचे आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी भाजपच्या वतीने शनिवारी सकाळी अकरा वाजता नेवासा फाटा येथील राजमुद्रा ...

Protest reported at Nevasa Fata | नेवासा फाटा येथे नोंदविला निषेध

नेवासा फाटा येथे नोंदविला निषेध

नेवासा फाटा : ओबीसी समाजाचे आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी भाजपच्या वतीने शनिवारी सकाळी अकरा वाजता नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात रास्ता रोकोद्वारे चक्का जाम आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाचा यावेळी निषेध नोंदविला.

यावेळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, नगरसेवक सचिन नागपुरे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

यावेळी तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय काळे, नामदेव खंडागळे, युवा मोर्चाचे निरंजन डहाळे, प्रदीप ढोकणे, ज्ञानेश्वर पेचे, दत्तात्रय पोटे, जिल्हा सरचिटणीस अंकुश काळे, भाऊ नगरे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे, आदी उपस्थित होते.

----

२६ नेवासा बीजेपी

नेवासा फाटा येथे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले.

260621\img-20210626-wa0015.jpg

ओ बी सी" च्या आरक्षणासाठी नेवासा फाटा येथे भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन.

Web Title: Protest reported at Nevasa Fata