शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार

By admin | Updated: July 28, 2014 00:52 IST

अहमदनगर : आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

अहमदनगर : आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गुन्हेगारांना हद्दपार करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. याशिवाय अवैध धंदे,कायदा-सुव्यवस्थेला हानी पोहचविणाऱ्या सर्व घटकांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी दिली.आतापर्यंत झालेल्या सर्व निवडणुकांमध्ये नगर जिल्ह्याने चांगले सहकार्य केले आहे. सर्व प्रक्रिया शांततेत पार पडल्या आहेत. त्यामुळे येणारी निवडणूकही शांततेत पार पडेल. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. सर्वच समाज घटक, शासकीय यंत्रणा, माध्यमांच्या सहकार्यामुळेच निवडणुका शांततेत पार पडल्या. यापुढेही त्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. आदर्श आचारसंहिता ही नेहमीच पाळायची असते. लोकांनी सोशल मीडियाला संयमाने हाताळण्याची गरज आहे. एखादा आक्षेपार्ह मजकूर वाचण्यात आला, तर आधी स्वत:चा मोबाईल फोडायला हवा आहे, पण तसे कुठे घडते का? लोकांची डोकी फोडली जातात, हे घातक आहे. समाजातील वाईट प्रवृत्तींना ठेचण्याचे काम पोलीस करतील. गुन्हेगारांबाबत बारकाईने आराखडा तयार करण्यात येत असून त्याला लवकरच अंतिम स्वरुप दिले जाईल. शांतता बिघडविण्याची संधी कोणालाही दिली जाणार नाही. मोक्कांतर्गत कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्याचीही लवकरच अंमलबजावणी होईल. गुन्ह्यांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा चांगल्या पद्धतीने काम करेल, यावरच भर देण्यात आला आहे. वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगला म्हणण्याची प्रवृत्ती ठेवली तर शांतता नांदेल. यासाठी सहकार्याची गरज आहे, असे शिंदे म्हणाले. (प्रतिनिधी)तीनशे पोलिसांची प्रतीक्षानगर जिल्ह्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या २७० पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. मात्र हे पोलीस बळ अद्याप जिल्ह्यासाठी मिळालेले नाही. सण,उत्सव, निवडणुका होईपर्यंत हे पोलीस बळ नगर जिल्ह्यासाठी उपलब्ध होण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे आहे त्या पोलिसांवरील ताण वाढणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झालेले पोलीस जिल्ह्यासाठी मिळावेत, यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत,असेही पोलीस अधीक्षक शिंदे यांनी सांगितले.