शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

७०५ ग्रामपंचायतींसाठी उद्या मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींच्या १ हजार ३२६ जागांसाठी ५ हजार ७९६ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांसाठी शुक्रवारी (दि. ...

अहमदनगर : जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींच्या १ हजार ३२६ जागांसाठी ५ हजार ७९६ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांसाठी शुक्रवारी (दि. १५) मतदान होत आहे. मतदानप्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दीड हजार कर्मचारी तैनात केले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचारी तैनात करण्यात आले असून, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींच्या ७ हजार १३४ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. ७६७ पैकी ५३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ९ ग्रामपंचायतींमध्ये काही जागा बिनविरोध झाल्या, तर ३९ जागांसाठी अर्जच प्राप्त न झाल्याने त्या रिक्त राहणार आहेत. तेथे पोटनिवडणूक होईल. बिनविरोध झालेल्या ५३ ग्रामपंचायतींमध्ये १ हजार ३२६ जागा होत्या. तब्बल ९ हजार उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ७०५ ग्रामपंचायतींसाठी १३ हजार १९४ उमेदवार रिंगणात आहेत.

--------

मतदानाची वेळ व तारीख

शुक्रवार, दि. १५ जानेवारी

वेळ- सकाळी ७.३० ते सायंकाळी ५. ३० वा.

मतमोजणी- १८ जानेवारी (तहसील कार्यालयात)

----------------

मतदान केंद्रांवर दीड हजार कर्मचारी

एका केंद्रावरील नियुक्ती- १ अधिकारी, ४ कर्मचारी

अधिकारी-५१९

कर्मचारी-१५ हजार १६४

एकूण-१५ हजार ६८३

एकूण मतदार-१३ लाख ६२ हजार ८८८

स्री मतदार-६ लाख ४८ हजार ५३३

पुरुष मतदार-७ लाख १४ हजार ३४६

--------------

कोरोना प्रतिबंधकात्मक उपाय

मतदान केंद्र गुरुवारीच सॅनिटाईज करण्यात येणार आहेत. मतदान केंद्रांवर मतदारांच्या तपासणीसाठी थर्मल स्क्रीनिंगद्वारे तापमान तपासला जाणार आहे. मतदारांना मास्क बंधनकारक असून, ओळख दाखविण्यापुरता मास्क काढावा लागेल. बाधित व क्वाॅरंटाइन रुग्णांसाठी शेवटचा अर्धा तास राखीव ठेवण्यात येणार आहे. कोरोनामुळे सामाजिक अंतर राखून मतदान करता यावे, यासाठी एका मतदान केंद्रावर सहाशे ते सातशे मतदारांना मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

------------