शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात ५६ गावांसाठी आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST

केडगाव : नगर तालुक्यातील ५६ गावांसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निंबळक, बुऱ्हाणनगरसह दरेवाडी व इतर काही ...

केडगाव : नगर तालुक्यातील ५६ गावांसाठी शुक्रवारी (दि.१५) मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निंबळक, बुऱ्हाणनगरसह दरेवाडी व इतर काही गावात निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष राहणार असून सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तीन भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

५६ गावातील १९९ प्रभागात २१९ मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली. ५८३ जागांसाठी १ हजार १८२ उमेदवार रिंगणात आहेत. एकुण १ लाख २१ हजार २७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यात ५७ हजार ३७६ महिला मतदान तर ६३ हजार ८९८ पुरुष मतदार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी उमेश पाटील यांनी १ हजार २५० मतदान अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाच्या आलेल्या मार्गदर्शक सुचना देऊन सर्व अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सुचना दिल्या. यानंतर सर्व केंद्राध्यक्षांना मतदानाचे साहित्य वितरीत करण्यात आले.

प्रत्येक केंद्राला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. नगर तालुक्यातील निंबळक, बुऱ्हाणनगर, दरेवाडी या ठिकाणी निवडणूक आयोगाचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यासाठी येथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच काही गावात चुरशीच्या लढतीमुळे वादावादी होण्याची शक्यता गृहीत धरून तीन भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच नायब तहसीलदार दर्जाच्या चार अधिकाऱ्यांचे पथके गावोगावी भेट देऊन पाहणी करणार आहेत. तालुक्यात सर्वत्र दुरंगी लढती होत आहेत. चुरशीच्या लढतींमुळे मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. बाहेरगावच्या मतदारांनाही उमेदवारांनी संपर्क करून मतदानासाठी येण्याची विणवनी केली आहे.

---------

नगर तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी फिरत्या पथकांची स्थापना करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिले आहे. ३ भरारी पथके तैनात आहेत.

-उमेश पाटील,

तालुका निवडणूक निर्णय अधिकारी, नगर

फोटो : १४ नगर तालुका

नगर तहसील कार्यालयातून मतपेट्यांसह मतदान केंद्रावर निघालेले निवडणूक कर्मचारी.