शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या स्थायी समितीतही रंगणार राजकारण

By admin | Updated: June 23, 2016 01:22 IST

अहमदनगर: महापालिकेत महापौर निवडणुकीनंतर आता स्थायी समिती सभापती पदाचे राजकारण रंगणार आहे. अर्धवट स्थायी समितीत सदस्य

अहमदनगर: महापालिकेत महापौर निवडणुकीनंतर आता स्थायी समिती सभापती पदाचे राजकारण रंगणार आहे. अर्धवट स्थायी समितीत सदस्य नियुक्तीनंतर नवीन सभापती निवड महिनाभरात होईल. एकीकडे सभापती पदाची संधी मनसेला की अपक्षांना याची उत्सुकता आता निर्माण झाली असताना दुसरीकडे स्थायी समितीचे संख्याबळही समसमान होत आहे. सभापती पदाच्या निवडणुकीतही फोडाफोडीचे राजकारण पुन्हा एकदा नगरकरांना पहावयास मिळेल.स्थायी समितीचे सोळा सदस्य असून त्यातील आठ सदस्य फेबु्रवारी महिन्यात निवृत्त झाले आहेत. विद्यमान सत्ताधारी राष्ट्रवादी आघाडीने नवीन सदस्य नियुक्त न करता आठ सदस्यांवरच स्थायी समितीचा कारभार चालविला. सभापती गणेश भोसले यांनी मोठ्या चलाखीने समिती चालविली. आता महापालिकेत सेनेचा महापौर झाला आहे. त्यामुळे नव्याने आठ सदस्य नियुक्त करून सभापती भोसले यांच्याऐवजी नवीन सभापती नियुक्त केला जाईल. मात्र हे करत असताना सत्तापक्षात बसलेली सेना व विरोधक आघाडी यांचे स्थायी समितीतील संख्याबळ समसमान म्हणजे ८-८ होईल. त्यामुळे सभापती पदाच्या निवडणुकीत सेनेला पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण करावे लागणार आहे. महापौर पदाची लढाई जिंकताना मनसेच्या सुवर्णा जाधव आणि विणा बोज्जा यांना सेनेकडून स्थायी समितीचा शब्द देण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मनसेचे गणेश भोसले व किशोर डागवाले यांना शह म्हणून सेना मनसेलाच पुन्हा सभापती पदाची संधी देण्याची शक्यता आहे. स्थायी समितीत सेनेचे अनिल बोरुडे, विद्या खैरे व छाया तिवारी, भाजपचे श्रीपाद छिंदम, उषा नलावडे असे पाच सदस्य आहेत. महासभेतून दोन तर सेनेला निवृत्तीबदल्यात एक सदस्य नियुक्त करता येणार आहे. त्यामुळे सेनेचे संख्याबळ आठवर पोहचते. राष्ट्रवादी ४ आणि कॉँग्रेसचा १ सदस्य नव्याने स्थायी समितीत जाईल. राष्ट्रवादी-कॉँग्रेस-मनसे आघाडीचे आठ सदस्य स्थायी समितीत असतील. त्यामुळे दोन्हींचे संख्याबळ समसमान झाले तर मात्र चिठ्ठी टाकून सभापती पदाची निवड होऊ शकते.