ट्रक धडकेने पोलीस ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:20 IST2021-03-22T04:20:28+5:302021-03-22T04:20:28+5:30

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजारतळानजीक असलेल्या पुलावर मालवाहू ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात ...

Police killed in truck crash | ट्रक धडकेने पोलीस ठार

ट्रक धडकेने पोलीस ठार

तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजारतळानजीक असलेल्या पुलावर मालवाहू ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोलीस हेड कॉन्स्टेबल जागीच ठार झाले. एकनाथ रामकृष्ण बर्वे (वय ४८) असे त्यांचे नाव आहे.

लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे गावानजीक शनिवारी (दि. २०) सायंकाळी ६.१५ च्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.

संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल एकनाथ रामकृष्ण बर्वे हे लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने दुचाकीवरून (एमएच १७, सीबी ८६९७) प्रवास करीत असताना तळेगाव दिघे येथील बाजार तळानजीकच्या पुलावर पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने (केए ३२, सी-५१६६ ) त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात एकनाथ बर्वे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Police killed in truck crash