काष्टीतील साडेअकरा लाखांच्या चोरीचा पोलिसांनी लावला छडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:27 IST2021-09-08T04:27:05+5:302021-09-08T04:27:05+5:30

काष्टी येथील जयश्री परमिटरुमचे मालक अमोल माणिकराव पाचपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. ...

Police have nabbed the theft of Rs 11.5 lakh from Kashti | काष्टीतील साडेअकरा लाखांच्या चोरीचा पोलिसांनी लावला छडा

काष्टीतील साडेअकरा लाखांच्या चोरीचा पोलिसांनी लावला छडा

काष्टी येथील जयश्री परमिटरुमचे मालक अमोल माणिकराव पाचपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपी रोहिदास थोरात हा मजुरीचे काम करून श्रीगोंदा येथील माळीनगर परिसरात राहत होता, नंतर मजुरीनिमित्ताने तो काष्टीत राहू लागला. थोरात याला दारूचे व्यसन होते, त्यामुळे तो जयश्री परमीटरुममध्ये दारू पिण्यासाठी जात होता त्याची व अमोल पाचपुते यांची जवळीक झाली. २७ ऑगस्ट रोजी अमोल पाचपुते यांनी बँकेत भरणा करण्यासाठी १ लाख ६० तसेच त्यांचे बंधू राजेंद्र पाचपुते यांच्याकडून दहा लाख रुपये आणले होते. हे पैसे हॉटेलमध्ये एका बॅगेत पैसे ठेवले होते. थोरात याने पाळत ठेवली आणि ही रक्कम चोरून उस्मानाबाद गाठले. श्रीगोंदा पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलिस हेड काॅस्टेबल अंकुश ढवळे, किरण बोराडे, प्रकाश मांडगे, संतोष फलके, अमोल कोतकर यांनी उस्मानाबाद येथे जाऊन थोरात याला अटक केली.

Web Title: Police have nabbed the theft of Rs 11.5 lakh from Kashti