शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेत पोलिसाला मारहाण; जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 16:29 IST

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील यात्रेत कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचा-याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार रविवारी घडला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश इथापे यांच्या फिर्यादीवरून एकास अटक केली आहे.

नेवासा : तालुक्यातील बालाजी देडगाव येथील यात्रेत कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचा-याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार रविवारी घडला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश इथापे यांच्या फिर्यादीवरून एकास अटक केली आहे.पोलीस कॉन्स्टेबल इथापे हे रविवारी कुकाणा दूरक्षेत्र येथे ड्युटीवर होते. सायंकाळी बालाजी देडगाव येथील आशिष हिवाळे यांनी इथापे यांनी फोन केला. यात्रेमध्ये काही महिला चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याचे सांगितले. इतर पोलीस कर्मचारी निवडणुकीमुळे इतरत्र गेले होते. त्यामुळे इथापे हे देडगाव येथे सायंकाळी साडेसात वाजता गेले. त्यांनी हिवाळे यांना भेटून त्या संशयीत महिलांबाबत माहिती घेतली. इथापे यांच्यासह हिवाळे, प्रमोद थोरात, लक्ष्मण सकट हे यात्रेत संशयीत महिलांचा शोध घेत होते. त्यांना दोन महिला संशयीत वाटल्या. त्यामुळे इथापे यांनी एका महिलेस विचारपूस केली. इथापे हे त्या महिलांना नाव, गाव विचारीत होते. त्यावेळी एक इसम तेथे आला. त्याने अर्वाच्य भाषा वापरली. त्यामुळे इथापे यांनी त्यास बाजूला घेतले. त्याने इथापे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी थोरात, हिवाळे यांनी त्या इसमास बाजूला केले. त्यानंतर नेवासा पोलीस ठाण्यात इथापे यांच्या फिर्यादीवरून नरहरी भाउराव मुंगसे यांच्या विरूद्ध सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर