शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर स्थिर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST

रोहित टेके लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात सर्वच जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा सर्वच क्षेत्रावर ...

रोहित टेके

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात सर्वच जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा सर्वच क्षेत्रावर विपरित परिणाम झालेला आहे. त्याचा थेट फटका रेल्वेलादेखील बसला आहे. त्यामुळे अनेक रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर ३० ते ५० रुपये, तर पार्किंगचे दर १० ते ४० रुपयांपर्यंत आकारले जात आहेत. मात्र, कोपरगाव रेल्वेस्थानकाचे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर प्रति व्यक्ती १० रुपये, तर पार्किंगचा दर १० ते २० रुपयांपर्यंत आकाराला जात आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावर पोहोचविण्यासाठी जाणाऱ्या नातेवाइकांना तूर्तास तरी दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे गेली अनेक वर्ष हे सर्व दर स्थिर आहेत.

कोपरगाव रेल्वेस्थानक हे तालुक्याच्या ठिकाणी आहे. या स्थानकावरून मनमाड, तसेच दौंडच्या दिशेने दररोज ३० पेक्षा जास्त एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत, तर पॅसेंजर रेल्वे बंद आहेत. या एक्स्प्रेसतून कोपरगाव स्थानकावरून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. परंतु, कोरोनामुळे गर्दी न करण्याचे प्रशासनाच्या सूचना असल्याने या स्थानकावर प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्याची संख्या कमालीची घटली आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकीट, तसेच पार्किंग ठेकेदारांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे.

..........

तिकीट

प्लॅटफॉर्म तिकीट प्रतिव्यक्ती - १० रुपये

पार्किंग तिकीट : दुचाकी १० रुपये, चारचाकी २० रुपये

................

प्लॅटफॉर्म तिकिटातून रेल्वेची कमाई

कोरोनामुळे रेल्वेस्थानकावर नातेवाइकांना पोहोचविण्यासाठी येणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे २४ तासांत २० ते २५ प्लॅटफॉर्म तिकीट घेतले जातात. यातून दोनशे ते अडीचशे रुपयांचे रेल्वेला उत्पन्न मिळते.

..........

प्रत्येक रेल्वे स्थानकाचे प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वेगवेगळे असतात. त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतो. कोपरगाव रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकिटासाठी प्रतिव्यक्ती दहा रुपये आकारले जातात. तसेच तपासणीत जर कुणी विनातिकीट आढळला तर त्यास २५० ते १००० पर्यंत दंड केला जातो.

- अनुरंजन कुमार, वरिष्ठ तिकीट परीक्षक, रेल्वे स्थानक, कोपरगाव