शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
2
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
3
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
4
Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज
5
IPL 2026: सूर्यकुमार यादवचा 'फ्लॉप शो' सुरूच, ६ पैकी ५ सामन्यात 'फेल'; MI संघाबाहेर काढणार?
6
Mamata Banerjee : "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
7
Vastu Tips: वारंवार येणारे अडथळे आणि आर्थिक चणचण? वास्तुशास्त्राचे 'हे' सोपे उपाय ठरतील रामबाण!
8
Latest Marathi News LIVE Updates: "ट्रम्प सर्वाधिक भ्रष्ट आणि निष्ठूर माणूस", माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचे टीकास्त्र
9
लग्नसराईपूर्वी सोन्या-चांदीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर...
10
ट्रम्प यांच्या धमकीवर इराणचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही अजून सर्व पत्ते उघडले नाहीत”
11
Unseasonal Rain: ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
12
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
13
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
14
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
15
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
16
Shapoor Zadran: अफगाणिस्तान क्रिकेटचा एकेकाळचा आधारस्तंभ, आज मृत्युशी देतोय झुंज, ओळखणंही झालं कठीण!
17
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
18
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
19
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
20
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगारांना पेन्शन

By admin | Updated: August 24, 2014 23:07 IST

लोणी : येणाऱ्या काळात साखर कामगारांकरिता पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

लोणी : अनेक संकटे आली तरी सर्वांच्या सहकार्याने पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखाना सुस्थितीत उभा आहे. सहकारी साखर कारखानदारीत सभासदांबरोबरच कामगारांनी दिलेले योगदान मोठे असून, येणाऱ्या काळात साखर कामगारांकरिता पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.साखर कामगार सभेच्या वतीने प्रवरानगर येथे विखे यांच्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. साखर कामगार सभेच्या वतीने विखे यांचा तलवार देऊन सत्कार करण्यात आला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, डॉ. भास्करराव खर्डे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब कडू, उपसभापती सुभाष विखे, पायरेन्सचे अध्यक्ष एम.एम. पुलाटे, कारखान्याचे उपाध्यक्ष रामभाऊ भुसाळ, साखर कामगार सभेचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, अध्यक्ष ज्ञानदेव आहेर आणि संचालक उपस्थित होते.सहकारी साखर कारखान्याची चळवळ ही कामगारांच्या भक्कम पाठबळावर उभी असल्याचे नमूद करून मंत्री विखे म्हणाले की, सहकारी चळवळीमुळेच परिसरात वैभव प्राप्त झाले. पद्मश्रींचा दृष्टिकोन यामागे वेगळा होता. शाश्वत विकासाचे मॉडेल हे शेतीतूनच उभे राहू शकते. यासाठी संशोधनाची गरज असून, शेतकऱ्यांमध्येच खरी प्रयोगशिलता असल्याचे त्यांनी नमूद केले.डॉ.विखे कारखान्याने ऊस वाढीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबविल्यानेच उद्दीष्टाइतके गाळप करू शकलो. ब्राझीलने साखर उद्योगात भरारी मारली असल्याने प्रत्येक कृषी विद्यापीठातील २५ विद्यार्थी अभ्यासासाठी ब्राझीलला पाठविण्याचा विचार सरकारच्या वतीने सुर आहे, असे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले़ सहकारी चळवळीमुळे सामाजिक दायित्व स्वीकारू शकलो. ही चळवळ राज्याने आणि देशाने स्वीकारली. नैसर्गिक संकटांचा सामना करतानाच उसाच्या उत्पादकतेसाठी आणि पाण्याच्या संघर्षासाठीही सज्ज व्हावे लागेल, असे ते म्हणाले. याप्रसंगी साखर कामगार सभेचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, अण्णासाहेब म्हस्के, भास्करराव खर्डे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदेव आहेर यांनी केले. राहुल मधुकर चौधरी आणि भिमराज नागरे या कामगारांच्या मुलांचा सत्कार विखे यांच्या हस्ते करण्यात आला. आभार प्रमोद रहाणे यांनी मानले. (वार्ताहर)गणेश साखर कारखान्याकडेही लक्षगणेश साखर कारखान्याचे भविष्यदेखील आता उज्ज्वल करायचे आहे. मुळा प्रवरा कामगारांची ६० कोटी रुपयांची देणी आतापर्यंत देण्यात आली असून, येणाऱ्या काळात उर्वरित प्रश्नही मार्गी लागतील. कामगारांसाठी पेन्शन योजना आणि कारखान्याच्या भागिदारीतून कामगारांच्या दहावीतील मुलांना लॅपटॉप देण्याचेही विखे यांनी सांगितले.