पाथरवाला माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:17+5:302021-07-24T04:14:17+5:30

कुकाणा : कुकाणा (ता. नेवासा) ग्रामसेवा मंडळ संचलित पाथरवाला माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. याही वर्षी ...

Patharwala Secondary School's 10th result is one hundred percent | पाथरवाला माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

पाथरवाला माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

कुकाणा : कुकाणा (ता. नेवासा) ग्रामसेवा मंडळ संचलित पाथरवाला माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. याही वर्षी विद्यालयाने निकालाची पंरपरा कायम राखली. विद्यालयातून परीक्षेला एकूण ३२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये सात विद्यार्थांनी विशेष प्रावीण्य मिळविले, तर २० विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि पाच विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विद्यालयात अनुक्रमे प्रथम क्रमांक पायल राजेंद्र पवार (८३. २० टक्के), द्वितीय महेश विठ्ठल साळंके (८२.२० टक्के), तृतीय साक्षी वसंत कचरे (८०.८० टक्के), चतुर्थ अभय उद्धवराव खाटीक (८०.२० टक्के) या प्रमाणे यश प्राप्त केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रमेश खाटीक, अध्यापक चंद्रकांत गुंड, ईस्माइल शेख, चंद्रकांत कचरे, क्रीडा शिक्षक सुनील पंडित यांचे मार्गदर्शन लाभले. कुकाणा ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष ॲड. देसाई देशमुख, सचिव तथा माजी आमदार पांडुरंग अभंग, शिवाजी गरड आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Web Title: Patharwala Secondary School's 10th result is one hundred percent