ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पांडुरंग अभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST2021-07-30T04:22:11+5:302021-07-30T04:22:11+5:30

भेंडा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांची नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर ...

Pandurang Abhang as the Chairman of Dnyaneshwar Temple Board of Trustees | ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पांडुरंग अभंग

ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पांडुरंग अभंग

भेंडा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग अभंग यांची नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्षपदी निवड झाली आहे. ज्ञानेश्वर कारखाना व उद्योग समूहाचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कारखाना संचालक चंद्रशेखर घुले, ज्येष्ठ संचालक ॲड. देसाई देशमुख, काकासाहेब नरवडे, विठ्ठलराव लंघे आदी उपस्थित होते. अभंग म्हणाले, स्व. बन्सी महाराज तांबे यांच्या निधनानंतर १९९४-९५ मध्ये ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली. २००४ मध्ये शिर्डी संस्थांनवर कामाची संधी मिळाली. त्या माध्यमातून ज्ञानेश्वर मंदिराला ५० लाख व कमानी साठी ५ लाख ५० हजार रुपयांचा निधी आणता आला. ज्येष्ठ नेते विश्वासराव गडाख यांचे उपस्थितीत ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाची सभा झाली. त्यात अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे.

Web Title: Pandurang Abhang as the Chairman of Dnyaneshwar Temple Board of Trustees