शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांसह एसटीलाही पंढरीची ओढ, दुसऱ्या वर्षी एक कोटी रुपयांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:14 IST

शिवाजी पवार श्रीरामपूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची आषाढी पायी वारी झाली नाही. याचा फटका वारकऱ्यांसह एसटी महामंडळालाही ...

शिवाजी पवार

श्रीरामपूर : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूरची आषाढी पायी वारी झाली नाही. याचा फटका वारकऱ्यांसह एसटी महामंडळालाही बसला आहे. राज्य सरकारने राज्यातून जाणाऱ्या केवळ ७ मानकरी पालख्यांसह इतर ४ पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी दिली होती. नगर जिल्ह्यातील महामंडळांच्या आगारांना त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

नगर जिल्ह्यातून दरवर्षी लाखो भाविक पंढरपूर येथे आषाढी एकादशीला जातात. पायी वारीसह एसटीने प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांची संख्याही मोठी असते. आषाढीनिमित्त बसेसच्या फेऱ्या अधिक होतात. मात्र त्यानंतरही पंधरा दिवस बसेस पूर्ण क्षमतेने धावतात. जिल्ह्यातील श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, नेवासेसह सर्वच आगारांच्या उत्पन्नात त्यातून वाढ होते. मात्र कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी महामंडळाला या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

-------

बसेस दरवर्षी पंढरपूरला सोडल्या जायच्या : ३००

----------

रुपये उत्पन्न मिळायचे एसटीला : एक कोटी रुपये

-------

प्रवासी एसटीतून प्रवास करायचे : दोन ते अडीच लाख

------------

यंदा एसटीने गेली एकच पालखी

पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील एकमेव पालखी यंदा एसटीने पंढरपूरला रवाना झाली होती. अन्य पालख्यांना मात्र कोरोनामुळे संधी मिळू शकली नाही.

--------------

जिल्ह्यातून दरवर्षी जाणाऱ्या पालख्या

जिल्ह्यातून दरवर्षी १० ते १२ मानाच्या पालख्या आषाढी वारीला जातात. त्याशिवाय इतर ७० ते ८० पालख्याही प्रस्थान करतात. प्रमुख पालख्यांमध्ये संत महिपती महाराज, संत निळोबाराय, देवगड, नेवासे येथील संत ज्ञानेश्वर, जंगली महाराज यांचा समावेश आहे.

----------

दरवर्षी पंढरपूरला आषाढी वारीला २०० ते २५० फेऱ्या होतात. ही संख्या ३०० चा टप्पाही ओलांडत. साधारणपणे १० ते १२ दिवस पूर्ण क्षमतेने बसेस धावतात. महिनाभर महामंडळाला भरघोस उत्पन्न मिळायचे.

- विजय गिते,

विभागीय नियंत्रक,

नगर.

----------

सरकारने सर्व उद्योग, व्यवसाय खुले ठेवले. मात्र वारकऱ्यांवर गदा आणली. खरेतर लशींचे डोस घेतलेल्या व नियम पाळणाऱ्या दिंडीला जाण्यास परवानगी द्यायला हवी होती. वारकऱ्यांना तसा निर्णय भावला असता.

-बबनराव मुठे, वारकरी, मुठेवाडगाव, श्रीरामपूर.

---------