शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सदस्याच्या घरावर हल्ला

By admin | Updated: August 23, 2014 00:43 IST

सोनई : पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे यांच्या घरावर दगडफेक करून गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरूवारी रात्री सोनई गावात घडली.

सोनई : पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे यांच्या घरावर दगडफेक करून गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरूवारी रात्री सोनई गावात घडली. उसनवारीच्या पैशाच्या वादातून हा प्रकार घडल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी नागरिकांनी सोनई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. तसेच घटनेचा निषेध म्हणून शुक्रवारी गाव बंद ठेवण्यात आले. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, गुगळे राहत असलेल्या सोनईतील घरी गुरूवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलवरून चौघे आले. त्यांनी तोंडाला फडके बांधलेले होते. आवारातील कारवर त्यांनी दगडफेक केली. या गोंधळामुळे गुगळे यांना जाग आली. त्यांनी बाहेर डोकावले असता त्यातील एकाने त्यांच्या दिशेने गोळीबार केला. ‘तुझा गेम करायला आलो’ असे म्हणत हल्लेखोर पसार झाले. अशी तक्रार गुगळे यांनी सोनई पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुध्द आर्म अ‍ॅक्ट व धमकी देणे या कलमान्वये अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. (वार्ताहर)ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चाया प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा नेला. तेथे गुगळे यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध करून आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, सरपंच सखाराम वाघ, अप्पासाहेब निमसे, नितीन दरंदले, राजेंद्र बोरुडे, कल्याण गडाख यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. गावात दादागिरी, दहशत सहन केली जाणार नाही. आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी यावेळी क रण्यात आली. आरोपींचा शोध सुरूया घटनेमागील नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु, हा प्रकार गुगळे यांच्या आर्थिक देवाणघेवाणीतून घडल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास सुुरु असून, आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.