शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
2
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
3
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
4
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
8
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
9
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
10
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
11
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
12
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
13
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
19
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
20
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
Daily Top 2Weekly Top 5

पळवे बुद्रुकची कोरोना मुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पळवे : पारनेर तालुक्यातील १३०० लोकसंख्या असलेले पळवे बुद्रुक हे गाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पळवे

: पारनेर तालुक्यातील १३०० लोकसंख्या असलेले पळवे बुद्रुक हे गाव कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे. काॅन्टॅक्ट ट्रेसींग आणि ग्राम दक्षता समितीने संशयीत तपासणीमध्ये सातत्य ठेवल्याने मेअखेर गावातील केवळ दोन रुग्णांवर उपचार सुरू असून, नव्याने एकही रुग्ण गावात आढळून आलेला नाही, असे ग्रामसेवक गणेश घुले यांनी सांगितले.

शहरातील काेरोना गावखेड्यात पोहाेचल्यानंतर पळवे बुद्रुक गावात एप्रिल महिन्यात ३२ रुग्ण आढळले होते. ग्राम दक्षता समितीने ज्या घरात रुग्ण आढळेल, त्यामधील व शेजारील २० जणांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्येकाची तपासणी करून कोरोना संख्या वाढू न देण्यावर समितीने भर दिला. लक्षणे दिसताच तपासणी करणे आणि उपचार घेणे असे नियोजन करण्यात आले. त्यामुळे मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या अवघी दहावर आली. मे अखेर ती फक्त दोन रुग्णांवर उपचार सुरू होते. आता मागील आठवड्यात गावात एकही रुग्ण न आढळल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला, तसेच ग्राम दक्षता समितीच्या या नियोजनाचे कौतुक केले. या कामी दक्षता समितीच्या अध्यक्ष सरपंच तेजस्वीनी सुरेश कळमकर, उपसरपंच शिवाजी पळसकर, आशा सेविका नंदा पळसकर, सदस्य गंगाराम कळमकर, ग्रामसेवक गणेश घुले, कर्मचारी बीपीन जाधव यांनी परिश्रम घेतले.

..........

गावात ८० टक्के लसीकरण

मंगळवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने देण्यात आलेल्या ६० कोव्हिशिल्ड लसीचे पळवे बुद्रुक येथील उपकेंद्रात लसीकरण करण्यात आले. गावोगावी लसीकरण पोहोचत असल्याने गर्दीचे प्रमाण कमी होऊन संसर्ग रोखण्यास मदत होत आहे. पळवे बुद्रुकमध्ये ४५ वर्षे वयापुढील ८० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदाम बागल यांनी सांगितले.