पाचेगाव विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:16 IST2021-07-18T04:16:29+5:302021-07-18T04:16:29+5:30

पाचेगाव : भारत सर्व सेवा संघ, पाचेगाव संचलित पाचेगाव (ता. नेवासा) येथील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. ...

Pachegaon Vidyalaya's 10th result is one hundred percent | पाचेगाव विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

पाचेगाव विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के

पाचेगाव : भारत सर्व सेवा संघ, पाचेगाव संचलित पाचेगाव (ता. नेवासा) येथील माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला. विद्यालयात पहिल्या तीनही क्रमांकावर मुलींनी बाजी मारली, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव यांनी दिली. प्रांजल शिवाजी जाधव हिने (९० टक्के, प्रथम), सुप्रिया शंकर धनाईत (८४.६० टक्के, द्वतीय), ऋतुजा बाळासाहेब टिक्कल (८०.८० टक्के, तृतीय). विशेष श्रेणीत १०, प्रथम श्रेणीत २३, द्वितीय श्रेणीत ४५ अशी एकूण ७८ मुले-मुली उत्तीर्ण झाली. यशस्वी विद्यार्थ्यांचे भारत सर्व सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र नलगे, सचिव प्रकाश जाधव, प्रा. डॉ. अशोक तुवर, संस्थेचे सदस्य, मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव, शिक्षकवृंद, कर्मचारी यांनी कौतुक केले.

170721\img-20210717-wa0098.jpg

पाचेगाव शाळेचा शंभर टक्के निकाल

Web Title: Pachegaon Vidyalaya's 10th result is one hundred percent