कांदा पिकावर पांढरी सड रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST2020-12-24T04:19:23+5:302020-12-24T04:19:23+5:30

राहाता तालुक्यातील नांदूर येथील अनिल भाऊसाहेब भदे, अशोक भाऊसाहेब भदे, सतीश दत्तात्रय दुबाले, अशोक बाळासाहेब भदे तसेच यादव मळा ...

Outbreak of white rot disease on onion crop | कांदा पिकावर पांढरी सड रोगाचा प्रादुर्भाव

कांदा पिकावर पांढरी सड रोगाचा प्रादुर्भाव

राहाता तालुक्यातील नांदूर येथील अनिल भाऊसाहेब भदे, अशोक भाऊसाहेब भदे, सतीश दत्तात्रय दुबाले, अशोक बाळासाहेब भदे तसेच यादव मळा येथील अमोल सोमनाथ दाभाडे या शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी पिकाचे नमुने गोळा केले. या निदानामध्ये पांढरी सड या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

कांद्याची पुनर्लागवड करण्याच्या वेळी कांद्याचे रोप हे ०.२ टक्के कार्बेन्डॅझिम या बुरशीनाशकाच्या द्रावणात १० मिनिटे बुडविल्यानंतर लागवड करावी. याशिवाय लागवडीपूर्वी जमिनीमध्ये मेटॅलिक्झिल ४ टक्के, ६४ टक्के डब्ल्यूडब्ल्यूपी किंवा कार्बेन्डॅझिम १२ टक्के, मेंकोक्केब ६३ टक्के डब्ल्यूपी किंवा पायरॅक्लोस्टोबिन ५ टक्के, मेटीराम ५५ टक्के डब्ल्यूजी यापैकी एका बुरशीनाशकाचा रासायनिक खताबरोबर एकरी एक किलो या प्रमाणात वापर करावा. यापैकी एखाद्या बुरशीनाशकांचा एक किलो प्रतिएकर ३०० लिटर पाण्यात मिसळून ड्रेंचिंगद्वारे देखील वापर वापर करता येईल, असे दवंगे यांनी सांगितले. त्याचबरोबर कांदा पिकामध्ये अन्नद्रव्यांचा वापर करताना एकरी २० किलो दाणेदार गंधक वापरावे, असे शांताराम सोनवणे यांनी सुचविले.

Web Title: Outbreak of white rot disease on onion crop