तिसऱ्या लाटेसाठी सज्जतेचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:27 IST2021-09-08T04:27:18+5:302021-09-08T04:27:18+5:30

कानडे म्हणाले, जगभरातील अनेक देश तिसऱ्या व चौथ्या कोविडच्या लाटेचा सामना करत आहेत. भारतातही तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली ...

Order of readiness for the third wave | तिसऱ्या लाटेसाठी सज्जतेचे आदेश

तिसऱ्या लाटेसाठी सज्जतेचे आदेश

कानडे म्हणाले, जगभरातील अनेक देश तिसऱ्या व चौथ्या कोविडच्या लाटेचा सामना करत आहेत. भारतातही तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. ती येऊ नये अशीच सर्वांची अपेक्षा आहे; मात्र तिसऱ्या लाटेचा सामना करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे.

उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्यामुळे येथे नवीन तंत्रज्ञ व वैद्यकीय अधिकारी यांच्या जागा भरल्या जातील. रुग्णालयाला आठ पदे मंजूर झाली आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपण स्वत: पाठपुरावा करणार आहोत. येथे उभारण्यात आलेल्या स्वतंत्र कोविड वाॅर्डामध्ये दीडशे रुग्णांना भरती करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सर्व रुग्णांना येथे वर्ग करून रुग्णालयात इतर आजारांच्या सेवा बहाल केल्या जाव्यात. कोविड वाॅर्डामध्ये बसविण्यात आलेल्या ऑक्सिजन यंत्रणेची चाचणी करून घेण्याचे आदेश कानडे यांनी दिले.

कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांना संसर्ग होण्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्यादृष्टीने शहरातील बालरोग तज्ज्ञांची स्वतंत्र समिती गठित करावी. त्यांच्या सूचनेवरून उपजिल्हा रुग्णालयामध्ये भौतिक सुविधा निर्माण करता येतील. त्याकरिता कोणतीही आर्थिक अडचण येऊ देणार नाही. तिसऱ्या लाटेपूर्वी शहरातील खासगी कोविड सेंटर चालकांना ऑक्सिजन व औषधे यांचा स्वत: साठा उपलब्ध करण्याची सूचना द्यावी. खासगी रुग्णालयांचा बोजा सरकारी यंत्रणेवर पडता कामा नये, असेही कानडे यांनी सांगितले.

Web Title: Order of readiness for the third wave