शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाला २२ लाखांची भरपाई देण्याचे आदेश

By admin | Updated: December 4, 2014 15:21 IST

चुकीचे इंजेक्शन देऊन रुग्णाचा पाय गमविण्यास कारणीभूत झालेल्या डॉ. पंकज हरिभाऊ जाधव (रा. राशिन, ता. कर्जत) यांना २२ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश

अहमदनगर : चुकीचे इंजेक्शन देऊन रुग्णाचा पाय गमविण्यास कारणीभूत झालेल्या डॉ. पंकज हरिभाऊ जाधव (रा. राशिन, ता. कर्जत) यांना २२ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष एस. एम. शिंबोले यांनी दिला आहे.कर्जत तालुक्यातील कोकणगाव येथील तात्या हौसराव गवारे यांना थंडी, तापाचा त्रास होता. गवारे हे २२ जून १९९९ रोजी डॉ. पंकज जाधव यांच्या राशिन येथील मातोश्री क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेले होते. डॉ. जाधव यांनी गवारे यांची तपासणी करून डाव्या पायाच्या खुब्यात सल्फाचे इंजेक्शन दिले. दुसऱ्या दिवशी गवारे यांना इंजेक्शन दिलेल्या जागेवर गाठ आली. पुणे येथे केईएम रुग्णालयात गेल्यानंतर गवारे यांना गँगरीन झाल्याने पाय खुब्यापासून काढावा लागला. अ‍ॅलोपॅथीचे ज्ञान नाही !गवारे यांनी जिल्हा तक्रार निवारण मंचाकडे तक्रार केली आणि नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज दाखल केला. डॉ. जाधव यांना अ‍ॅलोपॅथीचे ज्ञान नसल्याने चुकीचे इंजेक्शन दिले गेले. त्यामुळेच गवारे यांना पाय गमवावा लागला, असा निष्कर्ष मंचाने काढला आणि दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश केले. तसेच तक्रार दाखल केल्यापासून रकमेवर १० टक्के प्रमाणे व्याज देण्याचा आदेश दिला. डॉ. जाधव यांनी या आदेशाविरुद्ध राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे अपील केले. मात्र राज्य तक्रार मंचाने नुकसान भरपाई म्हणून सव्याज २२ लाख रुपये देण्याचे आदेश दिले.