शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक सवलतीचे उरले तीनच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST

अहमदनगर : कोरोनामुळे घसरलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी सरकारने बांधकाम क्षेत्रातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्कात ३१ मार्चपर्यंत सवलत देण्यात आली ...

अहमदनगर : कोरोनामुळे घसरलेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी सरकारने बांधकाम क्षेत्रातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारावरील मुद्रांक शुल्कात ३१ मार्चपर्यंत सवलत देण्यात आली होती. या सवलतीची मुदत संपण्यासाठी सुटीचे दिवस वगळून केवळ तीनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दी वाढली आहे. मात्र ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्क भरून दस्त नोंदणीची प्रक्रिया चार महिन्यांपर्यंत करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनमधून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले होते. त्यामध्ये जागांच्या खरेदी- विक्रीच्या व्यवहारामधील शहरी भागात सहा टक्के मुद्रांक शुल्क द्यावे लागत होते. त्यामध्ये पन्नास टक्के कपात करून केवळ तीन टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागले होते. ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. एक जानेवारीपासून सरकारने तीन टक्के सवलत पूर्णपणे बंद करण्याऐवजी एक टक्का सवलत बंद केली आणि ३१ मार्चपर्यंत दोन टक्के सवलत दिली. या सवलतीची मुदत ३१ मार्चला संपत आहे. २६ मार्च, ३० आणि ३१ मार्च असे कामकाजाचे केवळ तीनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या ही सवलत मिळविण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात सध्या एकच गर्दी उसळली आहे.

-------

शुल्क भरा, दस्त नोंदणीसाठी चार महिने

खरेदी- विक्रीच्या व्यवहारावर दोन टक्के सवलतीची मुदत ३१ मार्चला संपत आहे. मात्र नागरिकांनी केवळ मुद्रांक शुल्क भरावे, दस्त नोंदणीची प्रक्रिया पुढे चार महिन्यापर्यंत करता येणार आहे. एकाच वेळी मुद्रांक शुल्क भरणे व दस्तनोंदणी करणे यामुळे गर्दी वाढत आहे. शुल्क भरून नोंदणीसाठी पुढे चार महिने नागरिकांना दोन टक्के सवलतीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे गर्दी करू नये, असे आवाहन मुद्रांक जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

-------

रोज ५० ते ६० दस्त नोंदणी

३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कात दोन टक्के सवलत असल्याने जागांचे खरेदी -विक्री व्यवहार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयात तसेच तालुक्याच्या ठिकाणच्या निबंधक कार्यालयातही नागरिकांची गर्दी वाढली आहे. नगर शहरात सध्या ५० ते ६० दस्तांची नोंदणी होत आहे. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाचा ताण वाढला आहे, असे तेथील गर्दीवरून स्पष्ट झाले आहे.

-----------------