शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ १५१ गणेश मंडळांनीच घेतली अधिकृत वीज

By admin | Updated: September 12, 2016 23:11 IST

चंद्रकांत शेळके, अहमदनगर धार्मिक कार्यासाठी महावितरणकडून सवलतीच्या दरात अधिकृत वीजजोड देण्याची सुविधा असतानाही जिल्ह्यातील बहुतांश गणेश मंडळांनी महावितरणला याबाबत ठेंगा दाखवला आहे.

चंद्रकांत शेळके, अहमदनगरधार्मिक कार्यासाठी महावितरणकडून सवलतीच्या दरात अधिकृत वीजजोड देण्याची सुविधा असतानाही जिल्ह्यातील बहुतांश गणेश मंडळांनी महावितरणला याबाबत ठेंगा दाखवला आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडे तब्बल ३५७३ गणेश मंडळांची नोंदणी झालेली असताना केवळ १५१ मंडळांनीच अधिकृत वीजजोड घेतले आहेत. नगर जिल्ह्यात २८६० सार्वजनिक, २०८ खासगी, तर ५०५ एक गाव एक गणपती अशा एकूण ३५७३ गणेश मंडळांनी पोलीस ठाण्यांत नोंद केली आहे.याव्यतिरिक्त नोंदणी न झालेले शेकडो मंडळे आहेत. परंतु यातील केवळ १५१ मंडळांनीच अधिकृत वीजजोडणी घेतली आहे. कोणत्याही सार्वजनिक धार्मिक कारणासाठी महावितरण घरगुती दरापेक्षाही कमी दरात तात्पुरता वीजजोड संबंधित मंडळ किंवा संस्थेला देत असते. त्याची प्रक्रियाही सोपी आहे. परंतु अनेक मंडळे महावितरणकडून अधिकृत वीजजोड घेतच नाहीत. शेजारील घरातून किंवा मग थेट आकडा टाकून बिनदिक्कतपणे वीज वापरली जाते. गणेशोत्सवात देखावे किंवा गणपती आरास पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. हलत्या देखाव्यांच्या यंत्रणेसाठी किंवा विद्युत रोषणाईसाठी जादा भार आवश्यक असतो. घरगुती किंवा आकडा टाकून या यंत्रणा वापरल्यास शॉर्ट-सर्किटचा धोका कैक पटींनी वाढतो. त्यातून एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, ही बाब मंडळांबरोबरच महावितरणनेही गांभीर्याने घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात मंडळे अनधिकृत वीज वापरत असतानाही महावितरणने काहीही कारवाई केलेली नाही. धार्मिक कार्यात विघ्न नको म्हणून ते सोईस्कर दुर्लक्ष करतात, परंतु एखादा अपघात झाला, तर अप्रत्यक्षरित्या तेही या घटनेस जबाबदार ठरतात.