प्रवरासंगम शाळेतील बालचिमुकल्यांचा ऑनलाईन रंगला दिंडी सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:15 IST2021-07-20T04:15:54+5:302021-07-20T04:15:54+5:30

नेवासा फाटा : आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम जिल्हा परिषद शाळेतील बालचिमुकल्यांनी वारकरी परंपरा जपत वेशभूषा करून ऑनलाईन ...

Online Rangala Dindi ceremony of children of Pravarasangam school | प्रवरासंगम शाळेतील बालचिमुकल्यांचा ऑनलाईन रंगला दिंडी सोहळा

प्रवरासंगम शाळेतील बालचिमुकल्यांचा ऑनलाईन रंगला दिंडी सोहळा

नेवासा फाटा : आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम जिल्हा परिषद शाळेतील बालचिमुकल्यांनी वारकरी परंपरा जपत वेशभूषा करून ऑनलाईन दिंडी सोहळा साजरा केला. यावेळी तुळशीचे पावित्र्य जपण्यासाठी रोप लावून वृक्षारोपणही केले. शाळेच्या आदर्श शिक्षिका पुरस्कार विजेत्या सुनीता कर्जुले/राऊत यांच्या पुढाकाराने हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला.

प्रवरासंगम जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला. यात त्यांनी वारकरी, विठ्ठल-रुक्मिणी यांची वेशभूषा करून संप्रदायातील परंपरेचे दर्शन घडविले. बाल वारकऱ्यांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन टाळ-चिपळ्याचा गजर व विठूनामाचा जयघोष करत ऑनलाईन दिंडीद्वारे घरीच राहून आषाढी एकादशीचा मनमुराद आनंद लुटला. विठ्ठल व रुक्मिणीच्या वेशभूषेत शिवतेज सुनील शिंदे व रुपेक्षा संदीप पांडव होते. उपक्रमांचे सरपंच अर्चना सुडके, मार्गदर्शक संदीप सुडके, उपसरपंच गाडेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबासाहेब भालेराव यांनी कौतुक केले आहे. याकामी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र चापे व शिक्षकवृंद यांचे सहकार्य लाभले.

190721\img-20210719-wa0013.jpg

आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रवरासंगम शाळेतील बालचिमुकल्यांचा ऑनलाईन रंगला दिंडी सोहळा

तुळशीचे पावित्र्य जपण्यासाठी केले तुळशीचे वृक्षारोपण

Web Title: Online Rangala Dindi ceremony of children of Pravarasangam school