शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेल भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एसटीची ऑनलाईन बुकिंग अनेकांना ठाऊकच नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : सध्या सर्वच क्षेत्रांत ऑनलाईन सुविधांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटी महामंडळाने २०११ पासून ऑनलाईन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : सध्या सर्वच क्षेत्रांत ऑनलाईन सुविधांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. एसटी महामंडळाने २०११ पासून ऑनलाईन बुकिंग सेवा सुरू केली आहे. या ऑनलाईन सेवेला आता दहा वर्षे पूर्ण होत आहेत. नगर जिल्ह्यात या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहेत. मात्र, अजूनही काही प्रवाशांना एसटीची ऑनलाईन बुकिंग अनेकांना ठाऊक नसल्याचे समोर आले आहे.

नगर जिल्ह्यात एकूण १४ तालुके असून ११ बस आगार आहेत. या सर्व आगारांच्या माध्यमातून राज्यभर एसटीचे जाळे पसरलेले आहे. यात नगर शहरातील तारकपूर आगार हे जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे येथून सर्वच राज्यातील सर्वच जिल्ह्यात बसेस जातात. मधील काही वर्षात ऑनलाईन बुकिंगला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, कोरोनापासून या ऑनलाईन बुकिंग सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशाची संख्या वाढली आहे.

..............

या बसेससाठी होतेय सर्वाधिक ऑनलाईन बुकिंग !

तारकपूर आगारातून दररोज सुमारे १५ बस ऑनलाईन बुकिंगसाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये १० साधी, ३ निमआराम, २ शयनयान या बसेसचा समावेश आहे. येथून पंढरपूर, पुणे, कल्याण, उस्मानाबाद, मुंबई सेंट्रल, सोलापूर, नाशिक, धुळे या जिल्ह्यासाठी बसेस फेऱ्या मारतात.

...............

असे करावे ऑनलाईन बुकिंग !

मोबाईलद्वारे बुकिंग करताना प्रथम प्लेस्टोर मध्ये जाऊन एमएसआरटीसी डाऊनलोड करा. त्यानंतर संकेत स्थळ उघडा. त्यानंतर सोर्स उपलब्ध होतील. त्यामध्ये शिवनेरी, शिवशाही आणि सर्व असे ऑप्शन येतील. त्यापैकी एका ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर त्या बसचे आरक्षण किती हे समजेल, बुकिंग करताना प्रवासाची तारीख व वेळ घालावी, त्यात महिला, ज्येष्ठ आणि आरक्षित आसन किती हे दिसेल. आसनावर लाल रंग असेल. ही सर्व आसणे आरक्षित असतील त्यानंतर ज्यावर आपण क्लिक कराल, त्यावर आपले आसन आरक्षित होईल. त्यानंतर पेमेंट विविध डेबिट कार्डद्वारे आपण करू शकता, त्यासाठी ही ऑप्शन येतात पैसे भरल्यानंतर तिकीट कन्फर्म होईल.

..........

आम्हाला ठाऊकच नाही !

मी कायम महामंडळाच्या बसने प्रवास करतो. परंतु, ऑनलाईन पद्धतीने बुकिंग केली जाते. हे मला माहीतच नव्हते. आता मला समजले असून यापुढे या सुविधेचा लाभ घेणार आहे.

- नितीन शिंदे, प्रवासी

..............

खासगी ट्रॅव्हल्सकडून देण्यात येणाऱ्या सेवांच्या तुलनेत एसटी महामंडळदेखील कात टाकत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून एसटीला ऑनलाईन बुकिंगची सुविधा उपलब्ध असल्याचे आताच समजले. त्यामुळे याची संपूर्ण माहिती घेऊन याचा लाभ घेणार आहे.

- स्वप्नील मोरे, प्रवासी

............

सध्या लांब पल्ल्याच्या रातराणीसाठी सर्वाधिक ऑनलाईन बुकिंग होत आहे. कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटली आहे. पुढे चालून इतरही गाड्यांच्या बुकिंगची संख्या वाढू शकते.

- अभिजित आघाव, आगारप्रमुख, एस. टी. महामंडळ, तारकपूर आगार.

............स्टार १०८४...............