कांदा लिलाव आठवडाभर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:20 IST2021-03-26T04:20:13+5:302021-03-26T04:20:13+5:30

नगर बाजार समितीत सोमवार, गुरुवार व शनिवार असे आठवड्यातील तीन दिवस कांद्याचे लिलाव होतात. सध्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर ...

Onion auction closed for a week | कांदा लिलाव आठवडाभर बंद

कांदा लिलाव आठवडाभर बंद

नगर बाजार समितीत सोमवार, गुरुवार व शनिवार असे आठवड्यातील तीन दिवस कांद्याचे लिलाव होतात. सध्या बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांदाही लिलावासाठी येत आहे. परंतु चालू आठवड्यात शनिवार, रविवार, सोमवार अशी सलग बँकांना सुटी असल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. त्यातून कांदा लिलावाचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात अडचण येणार आहेत. त्यामुळे २६ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत होणारे कांदा लिलाव नेप्ती उपबाजार समितीकडून बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांनी लिलावासाठी कांदा आणू नये. २ एप्रिलपासून लिलाव पूर्ववत सुरू होतील याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी केले आहे.

------------

कांदा १४०० रुपये

गुरुवारी झालेल्या कांदा लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्याला १४०० रुपयांचा भाव मिळाला. नगर बाजार समितीत गुरुवारी (दि. २५) ५२ हजार ४४४ कांदा गोण्यांची (२८ हजार ८४४ क्विंटल) आवक झाली. त्यात प्रथम प्रतवारीला ११५० ते १४०० रुपयांचा भाव मिळाला. द्वितीय प्रतवारी ९५० ते ११५०, तृतीय प्रतवारी ६०० ते ९५०, तर चतुर्थ प्रतवारीला ३०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.

Web Title: Onion auction closed for a week