पाचेगावात शॉर्टसर्किटने एक एकर ऊस खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 18:25 IST2021-02-21T18:24:20+5:302021-02-21T18:25:02+5:30
नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात विजेच्या शॉर्टसर्किटने एक एकर ऊस आगीत जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

पाचेगावात शॉर्टसर्किटने एक एकर ऊस खाक
पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात विजेच्या शॉर्टसर्किटने एक एकर ऊस आगीत जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास घडली.
शनिवारी देखील याच ठिकाणी तारांमध्ये मोठ्या प्रमाणात घर्षण झाले होते. त्यात पाचेगावातील संतोष भाऊसाहेब साळुंके या शेतकऱ्याचा ऊस आगीतून वाचविण्यात यश आले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा ही घटना घडल्याने परिसरातील शेतकरी सध्या धास्तावले दिसत आहेत.
जयवंत किसन जाधव (रा.गुजरवाडी, ता.श्रीरामपूर) यांची पाचेगाव शिवारात सहा एकर शेतजमीन आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास शेतातील विजतारांमध्ये घर्षण होऊन तयार झालेले लोळ उसाच्या शेतात पडल्यामुळे एक एकर ऊस आणि प्लास्टिक पाईप आगीत जळून खाक झाले. या शेतकऱ्यांचे सव्वा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.