शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
4
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
5
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
6
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
7
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
8
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
9
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
10
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
11
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
12
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
13
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
14
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
15
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
17
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
18
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
20
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
Daily Top 2Weekly Top 5

हनीट्रॅप करणाऱ्या दोन महिलांसह एक आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST

अकोले तालुक्यातील शेती व्यवसाय करणारा एक पुरुष सोशल मीडियाच्या माध्यमातून हनीट्रॅप करणाऱ्या दोन महिलांच्या जाळ्यात अडकला. ११ जून रोजी ...

अकोले तालुक्यातील शेती व्यवसाय करणारा एक पुरुष सोशल मीडियाच्या माध्यमातून हनीट्रॅप करणाऱ्या दोन महिलांच्या जाळ्यात अडकला. ११ जून रोजी सदर व्यक्तीला आरोपींनी त्यांच्या संगमनेर येथील फ्लॅटवर बोलाविले. तेथे त्यास धमकी देऊन जबरदस्तीने शरीर संबंध करण्यास भाग पाडले. यावेळी उर्वरित दोघा आरोपींनी त्याचा अश्लील व्हिडिओ बनवून त्यास दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. पीडित व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा आरोपींनी त्यास मारहाण करत व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींना त्याने एटीएममधून काढून ३० हजार रुपये दिले. आरोपींनी उर्वरित १ लाख ७० हजार रुपयांसाठी त्या व्यक्तीकडे तगादा लावला होता. आरोपींचा त्रास असह्य झाल्याने शेवटी पीडित पुरुषाने पोलिसांत धाव घेत घटनाक्रम सांगितला. त्यानंतर पोलिसांना सापळा रचून तिघा आरोपींना जेरबंद केले. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

--------------------

असे केले आरोपींना जेरबंद

पीडित पुरुषाने तक्रार केल्यानंतर आरोपींना रंगेहात जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. यासाठी पोलिसांनी पिडित व्यक्तीकडे १० हजार रुपये दिले. आरोपींचा पैशांसाठी या व्यक्तीकडे तगादा सुरूच होता. पैसे घेण्यासाठी आरोपींना अकोले तालुक्यातील सुगाव फाटा येथे बोलाविले. पैसे घेण्यासाठी संगमनेर येथून एक महिला व पुरुष आले. पैसे घेत असतानाच सापळा लावून बसलेल्या पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.

--------------

आरोपींनी अनेकांना ब्लॅकमेल केल्याची शक्यता

पोलिसांनी अटक केलेल्या तिघा आरोपींनी अशाच पद्धतीने अनेकांना ब्लॅकमेल करून पैसे उकळल्याची शक्यता आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या लोकांनी न घाबरता तक्रार द्यावी, असे अवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता तपासी अधिकारी मिथुन घुगे यांनी वर्तविली आहे.