साईनाथ रुग्णालयात कोविड सेंटर नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:27 IST2021-09-08T04:27:12+5:302021-09-08T04:27:12+5:30

रुग्णालयात विनामूल्य उपचार होत असल्याने राज्याच्या विविध भागातून गोरगरीब रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. प्रसुती, सिझेरीयन, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, ...

No Kovid Center at Sainath Hospital | साईनाथ रुग्णालयात कोविड सेंटर नको

साईनाथ रुग्णालयात कोविड सेंटर नको

रुग्णालयात विनामूल्य उपचार होत असल्याने राज्याच्या विविध भागातून गोरगरीब रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. प्रसुती, सिझेरीयन, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, अतिदक्षता विभागातील उपचार, बालरोग, होमिओपॅथी तसेच आयुर्वेदिक उपचारासाठी रुग्णांची मोठी रिघ लागलेली असते. याशिवाय हे रुग्णालय शहराच्या मध्यवस्तीत आहे. कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा या भागात वावर वाढून कोविडचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्याऐवजी शहराच्या बाहेर व सर्व बाजुंनी बंदिस्त असलेल्या साई आश्रम इमारतीत पूर्ण क्षमतेने ही सेवा करावी, अशी मागणी होत आहे.

या आठवड्यात येथे शासकीय आदेशानुसार कोविडचे डीसीएचसी सेंटर सुरू करण्यात येणार आहे. यामुळे नॉनकोविड रुग्णसेवा बाधित होणार आहे. एकीकडे शासकीय कोविड सेंटर बंद असताना व शासकीय डॉक्टर्स आणि नर्सेसच्या मदतीशिवाय साई संस्थानने ही सेवा सुरू ठेवली आहे. आता साईबाबा रुग्णालयातील हा विभाग बंद करून कोविड रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. डॉक्टरांनीही साईनाथ रुग्णालयात नॉनकोविड सेवा सुरू ठेवावी. अन्य ठिकाणी कोविड रुग्णालयासाठी चक्रीय पद्धतीने डॉक्टर्स व नर्सेसच्या सेवा घ्याव्यात, अशी विनंती प्रशासनाला केली आहे.

...................

सद्यस्थितीत रुग्णालयात इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. जिल्हाभरातून उपचार घेण्यासाठी रुग्ण येतात. त्यांच्यासमवेत नातेवाईकही असतात. कोविड सेंटर सुरू केल्यास संसर्गाची भीती निर्माण होते. तसेच गोरगरीब रुग्णही सहजासहजी येथे येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी केविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: No Kovid Center at Sainath Hospital