एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:29 IST2021-02-05T06:29:13+5:302021-02-05T06:29:13+5:30
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील ० ते ५ वयोगटांतील सर्व बालकांना पल्स पोलिओ लसीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृती करणे ...

एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू
दहिगावने : शेवगाव तालुक्यातील ० ते ५ वयोगटांतील सर्व बालकांना पल्स पोलिओ लसीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृती करणे हे आरोग्य खात्यांच्या कर्मचाऱ्यांसह आपणा सर्वांची जबाबदारी आहे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आपण विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी केले.
दहिगावने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ लसीकरणाचा प्रारंभ डॉ. घुले त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी सरपंच सुभाष पवार, सेवा संस्थेचे अध्यक्ष शब्बीरभाई शेख, जहांगीर शेख, पांडुरंग खंडागळे, कडूबाळ घुले, रामकिसन जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी सुमित श्रावणे, गंगाधर पाबळे, मकरंद बारगुजे आदींसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
फोटो ओळी ३१ दहिगावने
दहिगावने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले यांच्या हस्ते करण्यात आला.