भानगावात आढळले नऊ फूट लांबीचे अजगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:36+5:302021-08-26T04:23:36+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील भानगावमध्ये ९ फूट लांब व १४ किलो वजनाचे अजगर आढळून आले. हे अजगर सर्पमित्र पंकज ...

भानगावात आढळले नऊ फूट लांबीचे अजगर
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील भानगावमध्ये ९ फूट लांब व १४ किलो वजनाचे अजगर आढळून आले. हे अजगर सर्पमित्र पंकज उजगरे व ओंकार परदेशी यांनी भानगावमधील धनगरवाडी परिसरामध्ये पकडले.
गेल्या काही दिवसांपासून कोळगाव, कोथूळ, ढोरजा, भानगावच्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात अजगर आढळून येत आहेत. भानगाव येथे पकडलेल्या या अजगराला सुरक्षितरीत्या चिखली घाटातील जंगलात निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले. यावेळी कोळगावचे उपसरपंच अमित लगड, निसर्गाचे सेवेकरी संघटनेचे दीपक बोडरे, सुनील कळसकर, विशाल मोरे, शरद गदादे, गोविंद शेलार, राहुल लगड, नीलेश लगड, वनविभाग कर्मचारी हरीश मुंडे, आनंद तिवारी उपस्थित होते.
----
फोटो आहे
250821\img_20210825_111836.jpg
भानगाव ता.श्रीगोंदा येथे सापडलेल्या अजगराला चिखली घाटातील जंगलात निसर्गाचे सानिध्यात मुक्त करताना सर्पमित्र पंकज उजागरे व इतर सहकारी.