शहरं
Join us  
Trending Stories
1
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
2
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
3
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
4
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
5
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
6
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
7
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
8
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
9
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
10
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
11
यशस्वी जैस्वालच्या अडचणी वाढल्या, NADA नं बजावली नोटीस; शेफाली वर्माही कारवाईच्या रडारवर
12
'राजा शिवाजी'ने आतापर्यंत कमावले 'इतके' कोटी, दुसऱ्या शुक्रवारचे आकडे समोर
13
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
14
गळाभेट घेतली, नमस्कार केला, पंतप्रधान मोदी भर मंचावर कुणासमोर झाले नतमस्तक, ती ज्येष्ठ व्यक्ती कोण?
15
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
16
Budget Travel: खिशात ५० हजार अन् परदेश वारी! 'या' ७ देशांमध्ये भारतीय रुपया आहे लय भारी
17
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
18
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
19
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
20
Astro Tips: देवापर्यंत प्रार्थना पोहोचली हे कसे ओळखावे? पूजेदरम्यान मिळणाऱ्या 'या' ५ खुणांचा नेमका अर्थ
Daily Top 2Weekly Top 5

नीलेश लंके यांच्या कामाची वेगवेगळ्या जिल्ह्यांतून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:17 IST

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील कोविड सेंटरला राज्याचे मंत्री, विविध जिल्ह्यांमधील आमदारांनी भेटी दिल्या आहेत. १४ एप्रिल रोजी सुरू ...

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील कोविड सेंटरला राज्याचे मंत्री, विविध जिल्ह्यांमधील आमदारांनी भेटी दिल्या आहेत. १४ एप्रिल रोजी सुरू झालेल्या या कोविड सेंटरमधून आतापर्यंत साडेेसात हजार रुग्णांनी कोरोनावर मात करून ते घरी परतले आहेत. त्यांच्या या कामाची माध्यम विश्वाने दखल घेत त्यांचे काम सातासमुद्रापार पोहोचविले. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत नीलेश लंके यांच्यासारखा आमदार असावा, अशीच अपेक्षा जनमानसातून व्यक्त झाली. प्रत्येक जिल्ह्यात नीलेश लंके यांच्यासारखे काम इतर आमदार का करू शकत नाहीत, असे प्रश्नही उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांना विचारले गेले. नीलेश लंके यांच्या कामाची दखल घेत असताना राज्यातील इतर आमदारांचा लेखाजोखाही मांडला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते मंत्री, आमदार, खासदारांनी आमदार लंके यांच्या कामाची दखल घेऊन कौतुक केले. यातील अनेक आमदारांनी कोविड सेंटरला प्रत्यक्ष भेटही दिली. राज्यात कुठेही गेले तरी नीलेश लंके यांचे विविध पद्धतीने स्वागत झाले. राज्याबाहेरही उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्य सचिवांनी थेट आ. नीलेश लंके यांच्याशी संपर्क करून कोविड सेंटरचे काम जाणून घेतले आहे.

दरम्यान, आमदार लंके यांच्या रुग्ण सेवेचे सोशल मीडियातून मोठे गुणगान होत आहे. शिरुर येथील टिकटॉक स्टार विद्याताई घोडे यांनीही आमदार लंके यांच्यावर गीत तयार केले आहे. आ. लंके यांनी घोडे यांच्या घरी भेट देऊन विद्याताई घोडे यांचा सन्मान केला आहे.

----

अजित पवारांना विचारला प्रश्न

सातारा येथे कोरोना आढावा बैठकीमध्ये पत्रकारांनी अजित पवार यांना सातारा जिल्ह्यात एखादा आमदार नीलेश लंके यांच्याप्रमाणे काम का करीत नाही? असा प्रश्‍न उपस्थित केला. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असल्याचे सांगत यावेळी अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील आमदारांची बाजू सावरून नेली. सातारा जिल्ह्यातही आ. लंके यांच्याप्रमाणेच झोकून काम करणाऱ्या आमदाराची आवश्यकता असल्याचे मत या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आले. याच जिल्ह्यातील एका कोविड सेंटरला आमदार लंके यांचे नाव दिले जाणार आहे.