पारनेर : तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर आमदार नीलेश लंके यांनी बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेतली. त्यांनी मुंबई ते नागपूर असा एकत्र विमान प्रवास केल्याचेही समजते.
देवरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी केली होती. तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पारनेरमध्ये येऊन थेट तहसीलदार देवरे यांची भेट घेतली. त्यानंतर बुधवारी लंके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर मुंबई-नागपूर विमान प्रवास करून थेट नागपूर गाठले. यामध्ये लंके यांनी फडणवीस यांची भेट घेऊन तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या गैरकारभाराची माहिती दिल्याचे समजते.